शुबमन गिल आयपीएल 2024 साठी गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. गिलच्या नेतृत्वात मंगळवारी (26 मार्च) गुजरात टायटन्स संघ चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळला. या सामन्याची नाणेफेक गिलने जिंकली आणि प्रथण गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेत असताना कर्णधार काहीसा गडबडला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी झाली. हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर 6 विकेट्सने मात केली. तर दुसरीकडे हंगामातील पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंभई इंडियन्सला 6 धावांनी पराभूत केले. हंगामातील आपला पहिला सामना जिंकल्यानंतर सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी गुजरात आणि सीएसके (GT vs CSK) आमने सामने आले होते. नाणेफेक जिंकल्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) गबडला की, नक्की काय निर्णय घ्यावा. सुरुवातीला त्याने प्रथम फलंदाजी घेतली होती. पण तत्काळ त्याने माफी मागितली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराची झालेली गडबड सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
A fun moment at the Chepauk.
Shubman Gill won the toss, but got confused and said we’re batting first and later said ‘sorry, bowl, bowl first’. 😄 pic.twitter.com/KsSNF66UKx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 26, 2024
चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या सामन्यासाठी एक बदल पाहायला मिळाला. मथिशा पथिराना याच्या जागी महिश थिक्षणा याला संधी दिली गेली आहे. (Batting or bowling? Shubman Gill Confused After Winning Toss, Video Viral)
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे , मुस्तफिजुर रहमान.
गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! महिला आशिया चषकाच्या तारखा जाहीर! पाहा संपूर्ण वेळापत्रक
प्रतीक्षा संपली! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार आयोजन