महिला आशिया चषक 2024 हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून या स्पर्धेच संपूर्ण वेळापत्रक दिले गेले आहे. 19 ते 28 जुलै यादरम्यान श्रीलंकेतील दांबुला याठिकाणी महिला आशिया चषकाचे सर्व सामने खेळले जातील. यावर्षी एकूण आठ संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, युएई, मसेशिया, नेपाळ आणि थायलँड हे संघ असतील. तत्पूर्वी महिला आशिया चषक 2022 मध्ये सात, तर 2018 साली या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता.
महिला आशिया चषक 2024 मध्ये एकूण दोन गट असतील. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ हे संघ असतील. तर ग्रुप बी मध्ये बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड हे संघ असतील. टुर्नामेंटमध्ये दररोज दोन सामने खेळले जातील. 19 जुलै रोजी पाकिस्तान विरुद्ध तेपाळ आणि भारत विरुद्ध यूएई असे सामने खेळले जातील. 20 जुलै रोजी नेपाळ विरुद्ध यूएई आणि भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळला जाईल. 22 जुलै रोजी श्रीलंका विरुद्ध मलेशिया आणि बांगलादेश विरुद्ध थायलँड सामना होईल. 23 जुलै रोजी पाकिस्तान विरुद्ध यूएई आणि भारत विरुद्द नेपाळ हे सामने खेळले जातील. 24 जुलै रोजी बांगलादेश विरुद्ध मलेशिया आणि श्रीलंका विरुद्द थायलंड सामना आयोजित केला गेला आहे. 25 जुलै रोजी सुट्टी असेल.
Exciting news for cricket fans! The ACC Women’s Asia Cup 2024 is set to kick off on July 19th in Dambulla! Brace yourselves for an action-packed tournament featuring the top 8 women’s cricket teams in Asia.
Know more at: https://t.co/LX8Qbm9ep2#ACCWomensAsiaCup2024 #ACC pic.twitter.com/t8Ngw8ZQRP
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) March 26, 2024
26 जुलै रोजी उपांत्य सामन्यांना सुरुवात होईल. पहिला उपांत्य सामना ग्रुप ए मधील पहिला संघ विरुद्द ग्रुप बी मधील दुसऱ्या क्रमांकावरील संघात होईल. तसेच दुसरा उपांत्य सामना ग्रुप बी मधील पहिला संघ आणि ग्रुप ए मधील दुसऱ्या संघात खेळला जाईल. 27 जुलै रोजी एकही सामना खेळला जाणार नाही. अंतिम सामन्यासाठी मात्र दोन्ही संघ सज्ज असतील, जो 28 जुलै रोजी आयोजित केला गेला आहे. (Big news! Women’s Asia Cup dates announced! See full schedule)
महत्वाच्या बातम्या –
प्रतीक्षा संपली! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार आयोजन
आयपीएलमध्ये दोन बळी घेताच बुमराहच्या नावे होणार मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज