ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या आठव्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघ जाहीर झाला. 15 जणांच्या या संघामध्ये रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच चार खेळाडूंना राखीव स्वरूपात संघात घेतले आहे. ऑस्ट्रेलियाची परिस्थिती पाहता भारतीय संघनिवडकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. विश्वचषकात भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार केएल राहुल हेच सलामीला उतरताना दिसतील. आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध सलामीला येत विराट कोहलीने शतक झळकावत संघाला एक पर्याय दिला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील भारतीय खेळाडूंच्या टी20 आकडेवारीचा विचार केल्यास, विराट वगळता इतरांची आकडेवारी भारतीय चाहत्यांना चिंतेत टाकणारी आहे.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना पूरक असतात. त्यामुळे त्या ठिकाणी वरच्या फळीतील फलंदाजांचे महत्त्व फार असते. रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 9 टी20 सामन्यांच्या सात डावात 26 च्या सरासरीने 181 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूला केएल राहुल हा ऑस्ट्रेलियन भूमीवर 6 सामन्यांच्या पाच डावात केवळ 22 च्या सरासरीने 108 धावा बनवू शकला. ही कामगिरी नक्कीच चांगली म्हणता येणार नाही.
या दोघांव्यतिरिक्त भारताचा सर्वात अनुभवी फलंदाज असलेल्या विराट कोहलीने मात्र ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी करून दाखवलीये. त्याने 11 सामन्यांच्या 10 डावात 64 च्या जबरदस्त सरासरीने 451 धावा चोपल्यात. विशेष म्हणजे यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे विश्वचषकात विराट कोणत्या फॉर्ममध्ये असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
टीका होऊनही भारतीय संघात संधी दिल्या गेलेल्या रिषभ पंतला ऑस्ट्रेलियात दोन टी20 सामने खेळताना केवळ 20 धावा करण्यात यश आले आहे. तर अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नावे 78 व अनुभवी दिनेश कार्तिकच्या नावावर 60 धावा आहेत. या संपूर्ण आकडेवारीचा विचार केल्यास भारताला विश्वचषकात विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून रहावे लागू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! संघनिवडीच्या बैठकीत संजूचे नावही घेतले नाही; बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा
जेव्हा ‘बॉल आउट’द्वारे भारताने पाकिस्तानला दिला होता धोबीपछाड, 3-0ने जिंकला होता सामना
आयपीएल 2023पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठी घडामोड! जयवर्धनेंचा प्रशिक्षकपदावरून राजीनामा, कारण…