ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) याने बिग बॅश लीग २०२१-२२ (big bash league 2021-22) च्या शेवटच्या सामन्यात तुफानी खेळी केली. मेलबर्न स्टार्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात बुधवारी (१९ जानेवारी) झालेल्या या सामन्यात मॅक्सवेलने ६४ चेंडूत नाबाद १५४ धावा केल्या. त्याने अवघ्या ४१ चेंडूत स्वतःचे शतक पूर्ण केले, तर २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर मेलबर्न सामन्यात १०६ धावांनी मोठा विजय मिळवला.
मॅक्सवलच्या धमाकेदार फलंदाजीमुळे मेलबर्न स्टार्सने २० षटकात दोन विकेट्सच्या नुकसानावर २७३ धावा केल्या. मॅक्सवेलने केलेल्या १५४ धावांच्या खेळीमध्ये त्याच्या २२ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.
We've run out of superlatives… the first ever 150 in the BBL!!! 🤩 #BBL11 pic.twitter.com/7gEA9cskB9
— KFC Big Bash League (@BBL) January 19, 2022
बिग बॅश लीगमध्ये एका खेळाडूने केलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. तसेच मेलबर्न स्टार्स बिग बॅश लीगमधील सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. एकंदरित विचार केला, तर मेलबर्न स्टार्स टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा तिसरा संघ ठरला आहे. अफगाणिस्तान संघाने २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-२० सामन्यात २७८ धावा केल्या होता आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांमध्ये पहिले स्थान पटकावले होते.
बिग बॅश लीगच्या इतिहासात क्रेग सिमंस सर्वात वेगवान शतक करणारा खेळाडू आहे. त्याने २०१३-१४ मध्ये पर्थ स्कॉर्चर्ससाठी खेळताना एडिलेड स्ट्राइकर्सविरुद्ध सर्वात वेगवान शतक केले होते. या सामन्यात क्रेगने अवघ्या ३९ चेंडूत शतक पूर्ण केले होते. आता मेलबर्न स्टार्ससाठी खेळताना मॅक्सवेलने होबार्ट हरिकेंसविरुद्ध बीबीएसच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठोकले.
व्हिडिओ पाहा- २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही |
दरम्यान, बीबीएलच्या यावर्षीच्या हंगामात मॅक्सवेलने १३ सामन्यात ४६८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ शतकांचा समावेश आहे. मेलबर्न स्टार्स संघ बीबीएलच्या नॉकआउट फेरीत पोहोचू शकला नाही. ८ संघांच्या गुणतालिकेत मेलबर्न स्टार्स १४ सामने खेळल्यानंतर सहाव्या स्थानावर आहे.
ग्लेन मॅक्लवेलने यावर्षी बिग बॅश लीगमधील उत्कृष्ट प्रदर्शनाचा फायदा आयपीएल फ्रेंचायजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पुढच्या आयपीएल हंगामात नक्कीच होईल. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने मॅक्लवेलला ११ करोड रुपयांमध्ये रिटेन केले आहे. मागच्या हंगामनानंतर विराट कोहलीनने आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते. आता आरसबीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी मॅक्लवेलकडे येण्याची शक्यता दाट आहे.
महत्वाच्या बातम्या –
वीरेंद्र सेहवाग पुन्हा दिसणार कर्णधाराच्या भूमिकेत, या स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्त्व
एटीके मोहन बागान दणक्यात पुनरागमनासाठी सज्ज; समोर केरला ब्लास्टर्सचे आव्हान!
क्या बात!! भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडेत पंचांनी झळकावलय खास शतक, वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –