ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेमध्ये क्रिकेट रसिकांसाठी रोज मनोरंजनाची उधळण होत आहे. चौकार व षटकारांच्या आतिषबाजीत प्रेक्षकदेखील सहभागी होऊन क्रिकेटचा आनंद लुटत आहेत. लीगमधील एका महत्त्वाच्या सामन्यात ख्रिस लिनने गगनचुंबी षटकार मारला असता गोलंदाज डॅनियल सॅम्सने त्यावर दिलेली प्रतिक्रिया सध्या क्रिकेट वर्तुळात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बीबीएलमध्ये १४ डिसेंबर रोजी ब्रिसबेन हिटचा सामना सिडनी थंडरशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना ब्रिसबेनने ११ षटकांत २ गडी गमावत ८९ धावा केल्या होत्या. १२ व्या षटकात डॅनियल सॅम्स गोलंदाजीसाठी आला असता लिनने षटकातील दुसऱ्या चेंडूवर आक्रमक फटका मारत चेंडू षटकारासाठी सीमापार पाठवला.
लिनने इतका जोरदार फटका मारला की मैदानातील सर्व प्रेक्षक तसेच गोलंदाज सॅम्सदेखील अचंबित झाला. डॅनियल सॅमने षटकार गेल्यानंतर अचंबित होण्याची जी प्रतिक्रिया दिली, त्याप्रतिक्रियेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/cricketcomau/status/1338409494598959104
असे असले तरीही या सामन्यात डॅनियल सॅम्सच्या आक्रमक खेळीनेच सिडनी थंडरला विजय मिळवता आला आहे.
प्रथम फलंदाजी करताना ब्रिसबेन हिटने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत १७८ धावा केल्या होत्या. ब्रिसबेनकडून कर्णधार लिनने आक्रमक ६९ धावांची खेळी केली. प्रतिउत्तरात एकवेळ २२ धावांवर ३ गडी बाद अशा नाजूक अवस्थेत असलेल्या सिडनी थंडर संघाकडून डॅनियल सॅम्सने केवळ २५ चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. सॅम्सने या खेळीत तब्बल ७ षटकारांची आतिषबाजी केली आहे. सॅमच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे राशिद! बिग बॅश लीगमध्ये पकडला अचंबित करणारा झेल, Video भन्नाट व्हायरल
मुशफीकूर रहीमने उगारला युवा खेळाडूवर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल
रहाणेच्या नेतृत्त्वाची कमाल! उत्कृष्ट प्लॅनिंगच्या जाळ्यात अडकला ऑस्ट्रेलियन फलंदाज, पाहा व्हिडिओ






