ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत आहेत. एकीकडे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे, तर दुसरीकडे बिग बॅश लीग देखील क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करत आहे. बीबीएलमध्ये चौकार व षटकारांसह उत्तम क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या (१३ डिसेंबर) होबार्ट हरीकेन्स व ऍडलेड स्ट्रायकर्स मधील सामन्यात राशिद खानने बाउंड्री जवळ अचंबित करणारा झेल पकडला.
ऍडलेडकडून खेळत असलेल्या राशिदने, या सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षणासह उत्तम गोलंदाजी करत एक विकेट देखील मिळवली आहे. मात्र, या सामन्यातील त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या झेलाचीच जास्त चर्चा होत आहे.
या सामन्यात होबार्टने १५ षटकात २ गडी गमावून १३७ धावा बनवल्या होत्या. १६ वे षटक वेगवान गोलंदाज पिटर सिडल टाकत होता. सिडलच्या चेंडूवर फलंदाज कॉलीन इंग्रमने जोरदार फटका मारला. चेंडू षटकारासाठी सीमा पार जाणार असे वाटत असतानाच राशिदने झेल पकडला. मात्र, झेल पकडल्यानंतर राशिद सीमारेषेच्या बाहेर जात होता पण राशिदने चेंडू हवेत फेकला व पुन्हा आपले संतुलन राखत उत्तम झेल पकडला. राशिदच्या या झेलचे क्रिकेट रसिकांकडून कौतुक केले जात आहे.
Rashid Khan told us he had some new tricks for #BBL10.
We didn't realise one of those would literally be juggling! 🤣 pic.twitter.com/TBqLDyylEo
— KFC Big Bash League (@BBL) December 14, 2020
Absolutely brilliant Rashid Khan @rashidkhan_19 well done 👏 https://t.co/FTijy87aXn
— Bashir19 (@Bashir192) December 14, 2020
राशिद या सामन्यात उत्तम गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करूनही संघाला विजय मिळवून देवू शकला नाही. होबार्टने या सामन्यात ऍडलेड संघाचा ११ धावांनी पराभव केला. डॉर्सी शॉर्टच्या आक्रमक ७२ धावांच्या खेळीमुळे होबार्टने २० षटकांत ५ गडी गमावत १७४ धावा बनवल्या. प्रतिउत्तरात ऍडलेड संघ केवळ १६३ धावाच बनवू शकला व होबार्टने सहज विजय संपादन केला.
महत्त्वाच्या बातम्या-
मुशफीकूर रहीमने उगारला युवा खेळाडूवर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल
रहाणेच्या नेतृत्त्वाची कमाल! उत्कृष्ट प्लॅनिंगच्या जाळ्यात अडकला ऑस्ट्रेलियन फलंदाज, पाहा व्हिडिओ
फॉकनरचा बटलर होता होता राहिला; बिग बॅशमधील मंकडींगचा Video व्हायरल