कोणत्याही गोलंदाजासाठी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणे ही मोठ्या सन्मानाची गोष्ट असते. भारतीय मूळ असलेला (Indian Origin) ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज गुरिंदर संधू (Gurinder Sandhu) याने नुकतीच बिग बॅश लीग (बीबीएल,BBL) मध्ये हॅट्रिक घेत (Hat-trick In BBL) इतिहास रचला आहे. त्याने बीबीएलमध्ये आपली पहिली आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिसरी हॅट्रिक पूर्ण केली आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियाई गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी त्याने लिस्ट ए क्रिकेट आणि ५० षटकांच्या सामन्यामध्ये २ वेळा हॅट्रिक घेतली होती.
या २८ वर्षीय डावखुऱ्या गोलंदाजाने सिडनी थंडर्सकडून पर्थ स्कॉचर्सविरुद्ध खेळताना सलग ३ चेंडूत ३ विकेट्स घेत आपली हॅट्रिक पूर्ण केली आहे. त्याने हा कारनामा २ षटकांच्या ३ चेंडूंमध्ये केला आहे. गुरिंदरने बाराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॉलिन मुनरोला बेन कटिंगच्या हातून झेलबाद केले होते. त्यानंतर सोळाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आरोन हार्डी आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने लॉरी इवांसला आपले शिकार बनवले होते.
अशाप्रकारे सलग ३ चेंडूंवर ३ फलंदाजांला पव्हेलियनला पाठवत तो सिडनी थंडर्ससाठी हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू बनला आहे. या संपूर्ण सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत.
Gurinder Sandhu now has not one, not two, but THREE domestic hat-tricks to his name. INCREDIBLE!
A BKT Golden Moment | #BBL11 pic.twitter.com/NUsnit0SFo
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2022
यापूर्वी गुरिंदरने सर्वप्रथम २०१८ मध्ये जेएलटी वनडे चषकामध्ये तास्मानिया संघाकडून खेळताना पहिलीवहिली हॅट्रिक घेतली होती. व्हिक्टोरिया संघाविरुद्ध त्याने हा पराक्रम केला होता. त्यानंतर गतवर्षी २०२१ मध्ये मार्श चषकात त्याने दुसऱ्यांदा हॅट्रिक घेण्याचा किर्तीमान केला होता. यासह तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २ हॅट्रिक घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन गोलंदाजही राहिला आहे.
यानंतर आता टी२० लीग सामन्यातही हॅट्रिक घेत तो दिग्गजांच्या यादीत सहभागी झाला आहे. गुरिंदरपूर्वी फक्त २ खेळाडूंनी ३ हॅट्रिक घेण्याचा पराक्रमक केला आहे. यामध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि भारताचा अमित मिश्रा यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मँचेस्टर युनायटेडमध्ये खळबळ! एकाच वेळी तब्बल १७ प्रमुख खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत
मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ कारणामुळे बीसीसीआय आयपीएल २०२२ चे सर्व सामने मुंबईत खेळवण्याच्या विचारात
अजबच! चेंडू स्टम्पला लागला, अंपायरनेही आऊट दिले होते, तरीही स्टोक्सला मिळाले ‘असे’ जीवदान
हेही पाहा-