---Advertisement---

‘मला खेळाडूंवर विनाकारण ओरडायला सांगतात’, बांग्लादेशच्या प्रशिक्षकाने केला आरोप

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 5:03 PM
---Advertisement---

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या आठवड्याच्या सुरुवातीला श्रीधरन श्रीराम यांची तांत्रिक संचालक म्हणून नियुक्ती केली होती, जो २०२२च्या टी-२० विश्वचषकापर्यंत संघाचा सल्लागार असेल. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक टी-२० स्पर्धांमध्ये संघाला मदत करेल. त्याचवेळी बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन म्हणाले होते की, मुख्य प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांना कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

बीसीबीचे तांत्रिक संचालक खालिद महमूद यांनीही सांगितले होते की, रसेल डोमिंगोची कामगिरी खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये संघाच्या अनुरूप नाही. यानंतर, दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या प्रशिक्षकाने बांगलादेश संघाबद्दल उघडपणे बोलले आणि दावा केला की संघावर खूप “बाह्य दबाव” आहे आणि बोर्ड त्यांना खेळाडूंवर ओरडण्यास सांगत आहे. मात्र, बीसीबीने असं काही असल्याचं नाकारलं आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा सर्वात अवघड ‘पेपर फुटला’, महत्वाच्या फलंदाजाची कमजोरी झाली उघड
‘तू आता चांगला नाचतोस!’ पुजाराने दिलेल्या उत्तरामुळे आकाश चोप्राची बोलती बंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---