---Advertisement---

दुःखद! हृदयविकाराच्या झटक्याने ‘या’ पंचांचा मृत्यू, नुकतीच डोळ्याला चेंडू लागल्याने झाली होती दुखापत

---Advertisement---

एकीकडे यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेटमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. गेली काही वर्ष देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये पंच म्हणून कार्यरत असणाऱ्या सुमित बंसल यांचे रविवारी (१० ऑक्टोबर) निधन झाले आहे. सुमित बंसल हे ४६ वर्षाचे होते. दिल्लीच्या रुग्णालयात असताना हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे वडील एसके बंसल हे सुद्धा आंतरराष्ट्रीय पंच होते.

२ ऑक्टोबर रोजी १९ वर्षांखालील वीनु मांकड स्पर्धेत हिमाचल आणि तामिळनाडू या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू होता. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होता. या सामन्यात सुमित बंसल हे पंचांची भूमिका पार पाडत होते.

त्यावेळी हिमाचल प्रदेशच्या फलंदाजाने जोरदार शॉट मारला, जो सुमित यांच्या चेहऱ्यावर जाऊन लागला होता. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. एका अधिकाऱ्याने म्हटले की, “रुग्णालयात दाखल केल्यानंतर २ दिवसानंतर त्यांना सुट्टी मिळाली होती. त्यांच्या अनुपस्थितीत दुसरे पंच प्रणव जोशी यांनी दोन्ही बाजूंनी पंचगिरी केली तर, राखीव पंच स्वेअर लेगला उभे होते.”

त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी सुमित बंसल यांच्या छातीत दुखायला लागले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी हा त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर रविवारी (१० ऑक्टोबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी २००६ मध्ये पंच म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी एक प्रथम श्रेणी सामन्यात आणि १९ लिस्ट ए सामन्यात पंचांची भूमिका पार पाडली होती. यामध्ये २०२०-२१ विजय हजारे ट्रॉफीचा देखील समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जेव्हा धोनी क्रिकेट खेळणं सोडेल, तेव्हा…’, धोनीच्या मॅच फिनिशर रुपाची पाँटिंगलाही भुरळ; दिली मोठी प्रतिक्रिया

आज ‘पर्पल पटेल’ करणार आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम आपल्या नावे?

मॅच फिनिशर धोनीचा उलगडा, दिल्लीविरुद्ध अंतिम षटकात ‘या’ योजनेसह उतरला आणि सामना पालटला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---