भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने रविवारी (दिनांक 26 मार्च) रोजी 2022-23 हंगामासाठी टीम इंडिया (वरिष्ठ पुरुष) साठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, आणि रविंद्र जडेजा यांना A+ श्रेणीमध्ये जागा मिळाली. म्हणजेच या चौघांना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतील.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बीसीसीआयने चार श्रेणींमध्ये संघातील खेळाडूंची विभागणी केली आहे. A+ श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये दिले जातील. A श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी, B श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी, तर C श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जातील. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या चौथांची निवड बीसीसीआयकडून सर्वोत्तम म्हणू केली गेली आहे. या चौघांनी A+ श्रेणीमध्ये जागा दिली गेली आहे.
A श्रेणीमध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, रिषभ पंत आणि अक्षर पटेल यांना सामील केले गेले आहे. या पाच खेळाडूंनी वर्षाला 5 कोटी रुपये दिले जातील. B श्रेणीमध्ये चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांना ठेवले गेले. या सहा खेळाडूंना वर्षाला 3 कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळतील. C श्रेणीमध्ये उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, दीपक हुड्डा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि केएस भरत या 11 खेळाडूंना सामील केले गेले आहे. C श्रेणीतील खेळाडूंना इतरांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजेच वार्षिक 1 कोटी रुपये मिळतील.
यावर्षी बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक खेळाडू करारांमध्ये महत्वाचा बदल पाहायला मिळाला. अष्टपैलू रविंद्र जडेजाने यावर्षीच्या करारात सुधारणा करत A+ श्रेणीमध्ये जागा मिळावली आहे. तर दुसरीकडे केएल राहुल याचे मागच्या काही महिन्यांतील प्रदर्शन पाहून त्याला A श्रेणीतून B श्रेणीमध्ये जागा दिली. ईशान किशन, दीपक हुड्डा, कुलदीप यादव, संजू सॅमसन, केएस भरत आणि आणि अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच बीसीसीआयकडून करारबद्ध केले गेले आहे. पण अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयंक अगरवाल, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा आणि दीपक चाहर यांना मात्र बीसीसीआयच्या करारातून मुक्त करण्यात आले आहे. (BCCI announces annual player retainership 2022-23)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेने घडवला इतिहास! टी20 मध्ये पार केले 259 धावांचे आव्हान, डी कॉकचे वादळी शतक
Final : शिखा अन् राधाच्या झुंजार खेळीच्या जोरावर दिल्लीने पार केली शंभरी, मुंबईपुढे 132 धावांचे आव्हान