भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) 2023-24 वर्षाची खेळाडूंसोबतची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. ह्यात ए-प्लस A+ श्रेणीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर अ श्रेणीमध्ये आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांच्या नावाचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे मंडळाने इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना करारातून वगळल्याचे दिसत आहे. ( BCCI announces annual player retainership 2023-24 Team India Senior Men )
A+ श्रेणी – रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
A श्रेणी – आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.
ब श्रेणी – सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
क श्रेणी – रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.
बीसीसीआयने A+ श्रेणीमध्ये 4, अ श्रेणीमध्ये 6, ब श्रेणीमध्ये 5 आणि क श्रेणीमध्ये 15 खेळाडूंना स्थान दिले आहे. निवड समितीने आकाश दीप, विजयकुमार विशक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा या खेळाडूंसाठी वेगवान गोलंदाजी कराराची शिफारस केली आहे. यासह बीसीसीआयच्या माहितीनुसार, जे खेळाडू किमान 3 कसोटी किंवा 8 वन डे सामने अथवा 10 ट्वेंटी-20 सामने खेळण्याच्या निकषांची पूर्तता करतात त्यांना प्रमाणित कालावधीत आपोआप क श्रेणीमध्ये सामाविष्ट केले जाईल.
NEWS 🚨- BCCI announces annual player retainership 2023-24 – Team India (Senior Men) #TeamIndia pic.twitter.com/oLpFNLWMJp
— BCCI (@BCCI) February 28, 2024
Grade A+
Rohit Sharma, Virat Kohli, Jasprit Bumrah and Ravindra Jadeja.#TeamIndia
— BCCI (@BCCI) February 28, 2024
Grade A
R Ashwin, Mohd. Shami, Mohd. Siraj, KL Rahul, Shubman Gill and Hardik Pandya.#TeamIndia
— BCCI (@BCCI) February 28, 2024
Grade B
Surya Kumar Yadav, Rishabh Pant, Kuldeep Yadav, Axar Patel and Yashasvi Jaiswal.#TeamIndia
— BCCI (@BCCI) February 28, 2024
Grade C
Rinku Singh, Tilak Verma, Ruturaj Gaekwad, Shardul Thakur, Shivam Dube, Ravi Bishnoi, Jitesh Sharma, Washington Sundar, Mukesh Kumar, Sanju Samson, Arshdeep Singh, KS Bharat, Prasidh Krishna, Avesh Khan and Rajat Patidar.#TeamIndia
— BCCI (@BCCI) February 28, 2024
अधिक वाचा –
– IND vs ENG : कसोटी मालिका गमावल्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने वाचला चुकांचा पाढा, अन् सांगितलं नेमकी कुठे झाली गडबड
– ICC Rankings : जयस्वालची क्रमवारीतही ‘यशस्वी‘ प्रगती; अन् गिल आणि जुरेल यांनाही झाला मोठा फायदा
– कसोटी सामन्याचे अखेरच्या क्षणी अचानक बदलले ठिकाण! कारण जाणून व्हाल थक्क