---Advertisement---

इथेही भेदभाव! भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक कराराची घोषणा, टॉप ग्रेडच्या खेळाडूंना पुरुषांपेक्षा ६.५ कोटी कमी

india women odi
---Advertisement---

बुधवारी (१९ मे) बीसीसीआयने २०२०-२१ साठी करारबद्ध केलेल्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. एकूण १९ खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये स्थान मिळाले आहे. गतवर्षी २२ खेळाडूंना हा करार मिळाला होता. म्हणजेच यावेळी खेळाडूंची संख्याही कमी झाली आहे. यात ग्रेड ए मध्ये ३, ग्रेड बी मध्ये १० आणि ग्रेड सी मध्ये ६ खेळाडू आहेत. ग्रेड एच्या खेळाडूंना वार्षिक ५० लाख, ग्रेड बीच्या खेळाडूंना वार्षिक ३० लाख आणि ग्रेड सीला १० लाख वार्षिक मिळतील.

पुरुष क्रिकेटपटूंमध्ये जे खेळाडू टॉप ग्रेड म्हणजेच ए+चे खेळाडू आहेत, त्यांना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. म्हणजेच महिला खेळाडूंपेक्षा ६.५ कोटीपेक्षा अधिक.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्रेड ए मध्ये टी-२० कर्णधार, हरमनप्रीत कौर, स्म्रिती मंधाना आणि पुनम यादव यांना स्थान मिळाले आहे. तर ग्रेड बीमध्ये वनडे आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज, झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, पुनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया आणि जेमिमा रोड्रिग्ज यांचा समावेश आहे. तसेच ग्रेड सीमध्ये मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, हरलीन देओल, प्रिया पूनिया आणि रीचा घोष यांना स्थान देण्यात आले आहे.

रिचा घोषचा पहिल्यांदाच करारबद्द खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर शेफाली वर्मा, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड यांच्या ग्रेडमध्ये वाढ झाली आहे. तसेच एकता बिष्ट, वेदा कृष्णमूर्ती, डी हेमलता आणि अनुजा पाटील हे आता करारबद्ध खेळाडू राहिले नाहीत.

वेदा कृष्णमूर्तीला नुकताच मोठा धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे तिचे आईचे आणि बहिणीचे निधन झाले आहे. तसेच जय शाह आणि बीसीसीआयने तिची विचारपूस केल्याबद्दल तिने आभार देखील मानले होते. हा करार ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ पर्यंत असणार आहे.

https://twitter.com/BCCIWomen/status/1395044677770829826?s=20

https://twitter.com/ICC/status/1395197835805700100?s=20

पुरुष आणि महिलांच्या करारात मोठे अंतर
पुरुषांच्या श्रेणीला चार प्रकारात विभागले गेले असून एकूण २८ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. ए+ ग्रेडला ७ कोटी, ए ग्रेडला ५ कोटी, बी ग्रेडला ३ कोटी आणि सी ग्रेडला १ कोटी दिले जातात. महिला क्रिकेटपटूंबद्दल बोलायचं झालं तर, फक्त १९ खेळाडूंना करार मिळाला आहे. महिला संघाने गेल्या टी -२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तरीदेखील त्यांच्यावर दुर्लक्ष केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बड्डे स्पेशल: भारतीय महिला क्रिकेटरसोबत झाला होता वाद, आता त्याच संघाचे बनलेत ‘महागुरु’; जाणून घ्या त्यांच्याविषयी

‘तो नेहमी मला स्वातंत्र्य देत असतो,’ अव्वल भारतीय गोलंदाजाने रोहितच्या नेतृत्त्वाचे गायले गुणगान

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, आयपीएल खेळणारे क्रिकेटपटू संघाबाहेर; वाचा कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---