क्रिकेटमध्ये नेहमीच कर्णधाराच्या शैलीविषयी चर्चा होत असते. काहीवेळा त्यांच्याच संघ सहकाऱ्यांना कर्णधाराविषयी मते विचारली जातात. अशीच वेळ भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर आली. एका मुलाखतीत शमीला भारतीय संघचा उपकर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाबद्दल विचारण्यात आला. त्यावर शमीने दिलखुलासपणे उत्तर देताना रोहितचे भरभरून कौतुक केले.
शमीने गायले रोहितचे गुणगान
कोरोनाच्या कारणाने आयपीएल स्थगित झाल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. खेळाडूंना यादरम्यान फावला वेळ मिळत आहे. याचवेळी काही खेळाडू विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखत देताना दिसतायेत. शमीने नुकतीच एका प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.
यामध्ये त्याला भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शमी म्हणाला, “गोलंदाज म्हणून मी जेव्हा त्याच्याकडे सल्ला मागायला जातो त्यावेळी तो नेहमी सकारात्मक गोष्टी सांगतो. रोहित नेहमी सांगतो की, तुला वाटेल तशी गोलंदाजी कर. एका गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे खूप गरजेचे आहे असे मला वाटते. तो नेहमी गोलंदाजांना स्वातंत्र्य देत असतो.”
रोहित सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार म्हणून काम करतो. दुसरीकडे, ३० वर्षीय शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून सावरून आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. शमी आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व करतो. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठीच्या संघात त्याचा समावेश केला गेला आहे.
अशी आहे रोहितची कर्णधार म्हणून कारकीर्द
भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला रोहित एक चाणाक्ष कर्णधार म्हणून ओळखला जातो. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. सोबतच भारतीय संघाचे नेतृत्व करत असताना रोहितने निदाहास ट्रॉफी व २०१८ आशिया कप भारताला जिंकून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
फटकेबाजांचे पितामह! ४० मिनिटात शतक अन् २ तासात द्विशतक झळकावणारे धुरंधर
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, आयपीएल खेळणारे क्रिकेटपटू संघाबाहेर; वाचा कारण
‘फर्स्ट स्टॉप मुंबई’; इंग्लंडला जाण्यापूर्वी अश्विनसह ‘या’ भारतीयांनी गाठली मुंबई, पाहा खास फोटो