मुंबई | भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंना वर्षाकाठी मिळणाऱ्या कराराच्या रकमेची घोषणा केली आहे. यात यावर्षीपासून काही बदलही करण्यात आले आहेत.
त्यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे पुरूष खेळाडूंच्या प्रकारात नविन श्रेणीचा समावेश करण्यात आला असुन त्याला A+ असे नाव देण्यात आले आहे.
तर महिला खेळाडूंसाठी आता C श्रेणीची घोषणा करण्यात आली आहे.
देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात तब्बल २००%ने वाढ करण्यात आली आहे.
हा करार आॅक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीसाठी असून सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने याची घोषणा केली आहे.
भारतीय संघातील पुरूष खेळाडूंची श्रेणी आणि त्यांचे मानधन:
अ+ श्रेणी: ( ७ कोटी ):
विराट कोहली, रोहीत शर्मा, शिखर धवन, जसप्रित बूमराह, भुवनेश्वर कूमार
अ श्रेणी: ( ५ कोटी ):
आर अश्विन, रविंद्र जडेजा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, वृद्धीमान सहा
ब श्रेणी: ( ३ कोटी ):
केएल राहूल, उमेश यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र यादव, हार्दिक पंड्या, इंशात शर्मा, दिनेश कार्तिक
क श्रेणी: ( ३ कोटी ):
केदार जाधव, मनीष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, सुरेश रैना, पार्थिव पटेल, जयंत यादव
भारतीय संघातील महिला खेळाडूंची श्रेणी आणि त्यांचे मानधन:
अ श्रेणी: ( ५० लाख ):
मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्म्रिती मानधना
ब श्रेणी: ( ३० लाख ):
पुनम यादव, वेदा कृष्णमूर्ती, राजेश्वरी गायकवाड, एकता बिश्त, शिखा पांडे, दिप्ती शर्मा
क श्रेणी: ( १० लाख ):
मानसी जोशी, अनूजा पाटील, मोना मेश्राम, नुझहत परवीन, सुषमा वर्मा, पुनम शर्मा, जेमीमाह रोड्रीगेज, पूजा वत्स्राकर, तानिया भाटीया.
देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या पुरूष खेळाडूंना जर तो संघात असेल ३५ हजार प्रत्येक दिवसासाठी, तर राखीव खेळाडूंना १७ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत.
देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या महीला खेळाडूंना जर ती संघात असेल १२ हजार ५००रूपये प्रत्येक दिवसासाठी, तर राखीव खेळाडूंना ६ हजार २५० रुपये देण्यात येणार आहेत.