भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठी घोषणा केली आहे. खरं तर, बीसीसीआयने कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी अतिरिक्त तिकिटांची विक्री करणार असल्याचे घोषित केले आहे. या महामुकाबल्यासाठी बीसीसीआय 1-2 हजार नाही, तर तब्बल 14 हजार अतिरिक्त तिकीटे विकण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि पाकिस्तान संघ 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम मैदानात आमने-सामने येणार आहेत.
खरं तर, बीसीसीआयने उद्घाटनाच्या सामन्याव्यतिरिक्त इतर काही सामन्यांमध्ये प्रेक्षकसंख्या कमी असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. खरं तर, 5 ऑक्टोबर रोजी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड आमने-सामने होते. हा सामना अहमदाबादमध्ये खेळवला गेला. या सामन्यासाठी प्रेक्षकांची संख्या खूपच कमी होती. 1 लाखांहून अधिक प्रेक्षकसंख्या असलेले नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) निम्मेदेखील भरले नव्हते. यानंतर अनेक क्रिकेट जाणकारांनी तिकीट विक्री करण्याचा सल्ला दिला होता.
14,000 tickets 🎟️ for the highly anticipated India vs Pakistan #CWC23 league match to go LIVE today. Grab your tickets soon 🙌
⏰ 12 PM IST onwards
💻 https://t.co/xAo55tWJkQ pic.twitter.com/Yh7SyN5n4N— BCCI (@BCCI) October 8, 2023
कधीपासून मिळणार तिकीटे?
विशेष म्हणजे, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील महत्त्वाचा साखळी सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्येच होणार आहे. या सामन्यासाठीची तिकीट विक्री 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12पासून सुरू झाले आहेत. क्रिकेट चाहते क्रिकेट विश्वचषकाच्या अधिकृत वेबसाईटवरून तिकीटे खरेदी करू शकतात.
बीसीसीआयपुढे अडचण
अशी परिस्थिती उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही बीसीसीआयला अशा संंकटाचा सामना करावा लागला आहे. बीसीसीआयने स्पर्धेच्या आधी 9 सामन्यांच्या तारखा बदलल्या. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अशात आता बीसीसीआयच्या तिकीट विक्रीच्या घोषणेनंतर सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानात येतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध
भारतीय संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. (bcci announces sale of 14000 extra tickets for india vs pakistan match on october 8 world cup 2023)
हेही वाचा-
Asian Gamesमध्ये Gold जिंकताच भारतीय खेळाडूंनी गायलं ‘लहरा दो’ गाणं, ठुमके लावत हटके सेलिब्रेशन- Video
इतिहास घडला, डिविलियर्सचा विक्रम तुटला! 21 वर्षीय फलंदाजाने ‘एवढ्या’ चेंडूत ठोकलं वेगवान शतक, लगेच वाचा