---Advertisement---

टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार भारत, वेळापत्रक जाहीर

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 8:10 PM
Rohit-Sharma-Team-India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (०३ ऑगस्ट) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांच्या आगामी भारत  दौऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टी२० विश्वचषक २०२२ पूर्वी हे दोन्हीही संघ भारतात येऊन मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या मालिका होतील.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, २० ते २५ सप्टेंबर दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल. २० सप्टेंबर रोजी मोहाली येथे पहिला टी२० सामना होईल. त्यानंतर अनुक्रमे नागपूर व हैदराबाद येथे दुसरा व तिसरा टी२० सामना होईल. २३ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर रोजी हे सामने खेळवले जातील.

त्यानंतर लगेचच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करण्यासाठी सज्ज होईल. २८ सप्टेंबर रोजी टी२० सामन्याने दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होईल. उभय संघ तिरुवनंतपुरम येथे पहिला टी२० सामना खेळतील. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी गुवाहाटीत दुसरा आणि ४ ऑक्टोबर रोजी इंदोर येथे तिसरा व अखेरचा टी२० सामना होईल. गुवाहाटीमध्ये होणारा दुसरा टी२० सामना खास असेल. कारण हा सामना महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी खेळला जाईल.

टी२० मालिकेनंतर ६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळेल. वनडे मालिकेतील सामने लखनऊ, रांची आणि दिल्ली येथे आयोजण्यात आले आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1554837279662739456?s=20&t=4YEznQBrXwMOFofhYHwzJA

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

टी२० मालिकेचे वेळापत्रक-
पहिला सामना- २० सप्टेंबर, मोहाली
दुसरा सामना- २३ सप्टेंबर, नागपूर
तिसरा सामना- २५ सप्टेंबर, हैदराबाद

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा

टी२० मालिकेचे वेळापत्रक-
पहिला सामना- २८ सप्टेंबर, तिरुवनंतपुरम
दुसरा सामना- २ ऑक्टोबर, गुवाहाटी
तिसरा सामना- ४ ऑक्टोबर, इंदोर

वनडे मालिकेचे वेळापत्रक-
पहिला सामना- ६ ऑक्टोबर, लखनऊ
दुसरा सामना- ९ ऑक्टोबर, रांची
तिसरा सामना- ११ ऑक्टोबर, दिल्ली

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिल्यामुळे ९ वर्षांनी घरी गेला ‘हा’ खेळाडू, वाचा कारण

CWG 2022 | ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान ४४ धावांनी पराभूत; स्पर्धेतूनही बाहेर

विराट कोहलीच्या कारकिर्दीला उतरती कळा..! टी२० क्रमवारीत ८ वर्षांतील सर्वात वाईट स्थानी घसरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---