भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात चांगले प्रदर्शन करत आहे. भारतीय संघाला विश्वचषक संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंड दौरा करायचा आहे. तसेच डिसेंबर महिन्यात संघ एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी बांगलादेश दौरा करणार आहे. बीसीसीआयने सोमवारी (31 ऑक्टोबर) या दोन्ही दौऱ्यांसाठी एकूण चार संघ घोषित केले आहेत. भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर संघाचा बांगलादेश दौरा 4 डिसेंबर पासून सुरू होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
🚨NEWS: The All-India Senior Selection Committee has picked the squads for India’s upcoming series against New Zealand and Bangladesh.
— BCCI (@BCCI) October 31, 2022
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांची भागादारीही महत्वाची, अर्शदीपने ‘या’ सहकाऱ्याला दिले यशाचे श्रेय
पुढील सामन्यात राहुल, कार्तिकला संघाबाहेर काढणार का रोहित? 3 बदल खूपच महत्त्वाचे