भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. मात्र या प्रकरणी बीसीसीआयने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोघांच्या कार्यकाळातील कुलिंग ऑफ कालावधी वाढवावा, असे बोर्डाचे म्हणणे आहे. त्यामुळे बोर्डाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले असून घटनादुरुस्तीची परवानगी मागितली आहे.
नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत बोर्डाने दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यात यावी, असे आवाहन बीसीसीआयकडून (BCCI) सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले आहे. या अपीलावर सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी सांगितले आहे की, पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होऊ शकते की नाही? ते पाहू.
२०१९मध्ये देखील बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये बीसीसीआयच्या घटनेत सुधारणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या याचिकेत मंडळाच्या वतीने अध्यक्ष, सचिव जय शहा (Jay Shah) आणि अन्य अधिकाऱ्यांच्या कुलिंग ऑफ कालावधीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती, तसेच घटनेशी संबंधित काही नियमांमध्ये बदल करण्याची परवानगी मागितली होती.
सौरव गांगुली (Saurav Ganguly) आणि जय शाह यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये अध्यक्ष आणि सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला होता. दोघांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असला तरीही तो सप्टेंबर २०२२ मध्ये संपणार आहे. त्यामुळे त्यांचा कालावधी वेळ जवळ आली आहे, परंतु बीसीसीआयने पुढील प्रक्रिया सुरू केलेली नाही, म्हणूनच बोर्ड कुलिंग ऑफ कालावधी वाढवण्याची मागणी करत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऍजबस्टन कसोटीतील वाद विसरून विराट-बेयरस्टोची ‘ग्रेटभेट’, हात मिळवण्याबरोबरच मिठीही मारली
भारताविरुद्ध खेळण्यापूर्वी इंग्लंडने केले ‘या’ तीन खेळाडूंना संघाबाहेर, वाचा नेमके काय झाले ते
काय ती स्टाईल, काय तो ऍटिट्यूड! विराट कोहलीचा लॉर्ड्सच्या मैदानावर जातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल






