भारताचे माजी यष्टीरक्षक अजय रात्रा यांची बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये 19 वर्षाखालील संघाच्या क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.
रात्रा यांनी भारताकडून 6 कसोटी सामने खेळले असून यात 163 धावा केल्या आहेत. यात त्यांच्या एका शतकाचा समावेश आहे. 115 धावांचे हे नाबाद शतक त्यांनी विंडिज विरुद्ध अँटिगामध्ये 2002 साली 8व्या क्रमांकावर फलंदाजीला येत केले होते.
त्यावेळी ते कसोटीत शतक करणारे सर्वात कमी वयाचे यष्टीरक्षक ठरले होते. त्यांचे वय त्यावेळी 20 वर्ष आणि 150 दिवस होते. तसेच परदेशात कसोटी शतक करणारे ते केवळ दुसरेच भारतीय यष्टीरक्षक होते. ही कामगिरी त्यांनी त्यांच्या तिसऱ्याच कसोटी सामन्यात केली होती.
तसेच त्यांनी भारताकडून 12 वनडे सामनेही खेळले आहेत. यात त्यांनी 90 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्यांचा 2000 साली 19 वर्षांखालील विश्वविजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघातही समावेश होता.
रात्रा यांनी याआधी पंजाब रणजी संघाबरोबरही काम केले आहे. तसेच त्यांनी मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षक पदासाठीही अर्ज केला होता.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये 19 वर्षाखालील संघाच्या क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण प्रशिक्षकपदी निवड झाल्याची त्यांनी ट्विटरवरुन माहीती दिली.
Ajay Ratra appointed Fielding & WK coach of India U-19 NCA Camp at Bangalore by NCA-BCCI – Team Ajay Ratra / Stardesk #ajayratra #coach #nca #nationalcricketacademy #bcci #stardesk pic.twitter.com/htSu7SifDx
— Ajay Ratra (@ajratra) July 28, 2018
सध्या 19 वर्षांखालील भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असुन नुकतीच त्यांनी चार दिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला आहे.
19 वर्षांखालील या संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. परंतू द्रविड सध्या भारत अ संघाबरोबर इंग्लंड दौऱ्यावर असल्याने त्याच्या गैरहजेरीत 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या मार्गदर्शनाची भूमीका डब्ल्यूव्ही रमण करत आहेत.
द्रविड आणि रात्रा हे भारतीय संघातून याआधी एकत्र खेळले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–स्टुअर्ट ब्रॉड म्हणतो, इंग्लंडमधील खेळपट्ट्या कशा असतील याची क्युरेटरलासुद्धा कल्पना नाही
–इंग्लंडचा सर्वकालीन दिग्गज फलंदाज म्हणतो विराटपासून इंग्लंडला धोका
–कुलदीप नकोच, अश्विनच बेस्ट; ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत