---Advertisement---

रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रिदची 18 वर्षांची ही पंरपरा खंडीत

On: रविवार, जुलै 29, 2018 12:17 PM
---Advertisement---

क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रिदचा एक सुवर्णमय कालावधी संपण्याच्या मार्गावर दिसत आहे. सध्या संघात बॅलोन डी’ओर हा पुरस्कार मिळवलेला एकही खेळाडू नाही. यामुळे 18 वर्षांपासून चालत आलेली रियलची ही पंरपरा रोनाल्डोच्या जाण्याने खंडीत झाली आहे.

 2000मध्ये लुइस फागो हे बॅलोन डी’ओर पुरस्कार मिळालेले रियलचे दुसरे फुटबॉलपटू होते. त्यांच्या आधी 1964 मध्ये अलफ्रेडो डी स्टेफॅनो हे होते. त्यांना 1956मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.

1998ला झिडने यांनी हा पुरस्कार जिंकला होता. त्यांच्यासोबत लुइस रोनाल्डो याला बार्सेलोना कडून खेळताना 1999ला तर 2002 मध्ये दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला तेव्हा तो रियल कडून खेळत होता.

2004मध्ये मायकल ओवेनच्या रूपाने अजून एक फुटबॉलपटू रियलला मिळाला. त्याने 2001 हा पुरस्कार मिळवला होता. त्याने लीव्हरपूलकडून खेळताना इंग्लिश फुटबॉल लीग कप, अमिराती कप आणि युरो कप जिंकला आहे.

इटालियन फुटबॉलपटू फॅबीओ कन्नवरोला 2006चा बॅलोन डी’ओर पुरस्कार मिळाला. तो रियलकडून 2006-09 या दरम्यान खेळला. त्याच्यानंतर ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू काका हा 2009-13 पर्यंत रियलकडून खेळला. त्याला 2007ला हा पुरस्कार मिळाला होता.

2008 पासून ते आतापर्यंत लियोनल मेस्सी आणि रोनाल्डो हे दोघेच या दहा वर्षाचे पुरस्काराचे विजेते होते. ह्या दोघांनीही सर्वाधिक असा पाच वेळा हा पुरस्कार मिळवला आहे.

हा पुरस्कार मिळालेला एखादा तरी खेळाडू 2000 पासून ते 2018 पर्यत रियलमध्ये होता.  या डिसेंबर महिन्यापर्यत तरी ही पंरपरा खंडीतच राहणार आहे. कारण रियलचे राफेल वॅरने आणि ल्युका मोड्रीच हे दोघेही या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.

18 वर्षांमध्ये बॅलोन डी’ओर पुरस्कर प्राप्त रियल माद्रिदकडून खेळणारे खेळाडू

2000-01 लुइस फागो

2001-02 लुइस फागो, झिनेदीन झिडने(1998,2002), लुइस रोनाल्डो(1997,2002)

2002-03 लुइस फागो, झिनेदीन झिडने, लुइस रोनाल्डो

2003-04 लुइस फागो, झिनेदीन झिडने, लुइस रोनाल्डो

2004-05 झिनेदीन झिडने, लुइस रोनाल्डो, मायकल ओवेन (2001)

2005-06 झिनेदीन झिडने, लुइस रोनाल्डो

2006-07 फॅबीओ कन्नवरो(2006), लुइस रोनाल्डो

2007-08 फॅबीओ कन्नवरो

2008-09 फॅबीओ कन्नवरो

2009-10 काका(2007), क्रिस्तियानो रोनाल्डो(2008)

2010-11 काका, क्रिस्तियानो रोनाल्डो

2011-12 काका, क्रिस्तियानो रोनाल्डो

2012-13 काका, क्रिस्तियानो रोनाल्डो

2013-14 क्रिस्तियानो रोनाल्डो(2008, 2013)

2014-15 क्रिस्तियानो रोनाल्डो(2008, 2013, 2014)

2015-16 क्रिस्तियानो रोनाल्डो

2016-17 क्रिस्तियानो रोनाल्डो(2008, 2013, 2014, 2016)

2017-18 क्रिस्तियानो रोनाल्डो(2008, 2013, 2014, 2016, 2017)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-   

या खेळाडूने घ्यावी रोनाल्डोची जागा, रियल माद्रिदच्या चाहत्यांची मागणी

दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी रोनाल्डोला भरावे लागणार तब्बल १५० कोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment