---Advertisement---

फिरकीपटू अन् यष्टीरक्षकांच्या निवडीवर सर्वांच्या नजरा, टी२० विश्वचषकासाठी ‘या’ खेळाडूंची भारतीय संघात वर्णी?

On: मंगळवार, सप्टेंबर 7, 2021 5:11 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषक स्पर्धा जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे भारतीय संघ निवडीला आता वेग आला आहे. त्यासाठीच्या हालचाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सुरू झाल्या आहेत. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची येत्या ७ किंवा ८ सप्टेंबरला मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात बैठक होण्याची शक्यता आहे, ज्यात कर्णधार विराट कोहली मँचेस्टरहून आणि लंडनहून प्रशिक्षक रवी शास्त्री हे ऑनलाईन सहभागी होतील. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह (निवड समितीचे निमंत्रक) हे देखील समितीच्या सर्वात महत्वाच्या बैठकीत भाग घेतील.

बहुतेक संघ या विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करत आहेत. तर बीसीसीआय १८ किंवा २० जणांच्या संघाची घोषणा करू शकते. कोविड-१९ साथीमुळे आयसीसीने संघात २३ ऐवजी ३० जणांना मान्यता दिली आहे. यामध्ये सपोर्टिंग टीम मेंबर्सचाही समावेश आहे.

कोणत्याही संघात ३० पेक्षा जास्त सदस्य असू शकतात. परंतु त्याचा खर्च संबंधित देशाच्या क्रिकेट बोर्डाला उचलावा लागेल. भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात किमान १३ ते १५ सदस्यांची निवड होणे जवळजवळ निश्चित आहे. काही खेळाडूंच्या बाबतीत निवडकर्त्यांना चर्चा करावी लागेल.

जेव्हा भारतीय संघ निवडकर्ते पुढील महिन्यातील आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी संघ निवड करतील, तेव्हा त्यांच्याकडे गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर हे अतिरिक्त फिरकीपटू म्हणून उपलब्ध असतील. दोघांपैकी एकाला निवडणे हे एक आव्हान असेल.

फिरकीपटूंसाठी युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजाचे संघातील स्थान जवळपास निश्चित आहे. रिषभ पंत आणि केएल राहुल दोघेही यष्टीरक्षकाची भूमिका निभावण्यास सक्षम आहेत. अशा स्थितीत श्रीलंकेत चांगली कामगिरी करणाऱ्या इशान किशनला प्रतिभावान संजू सॅमसनपेक्षा प्राधान्य दिले जाऊ शकते. सॅमसन त्याच्या प्रतिभेनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. सूर्यकुमार यादव संघात स्थान मिळवू शकतो, तर श्रेयस अय्यरही परतण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा आणि केएळ राहुल नंतर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यात अतिरिक्त सलामीवीर पदासाठी स्पर्धा होईल. धवन आणि शॉ यांनी आयपीएलमध्ये आणि नंतर श्रीलंका दौऱ्यावर चांगली कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांची वेगवान गोलंदाजी विभागात निवड होणे जवळजवळ निश्चित आहे. दीपक चहर आणि मोहम्मद सिराज हे देखील यामध्ये प्रबळ दावेदार आहेत.

वॉशिंग्टन सुंदर आयपीएलमधून दुखापतीमुळे बाहेर आहे. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये चेतन साकारिया आणि टी नटराजन हे देखील संघात स्थान मिळवण्याचे दावेदार आहेत. नटराजन बराच काळ खेळापासून दूर आहे, सकरीया निव्वळ गोलंदाज म्हणून संघासोबत येऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग! पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडने घोषित केला संघ, बटलरचे पुनरागमन; ‘या’ फिरकीपटूचीही निवड

शंभर सामने उलटले, पण शैली तीच!! बुमराहची पहिली अन् शंभरावी विकेट, बघा खास व्हिडिओ

पत्नीचं प्रेम! ओव्हल कसोटीतील शानदार कामगिरीनंतर बुमहारची पत्नी संजनाची स्पेशल पोस्ट, फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---