भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) १७ ऑक्टोबर रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या दोन नवीन संघांचा लिलाव आयोजित करू शकते. हा लिलाव दुबई किंवा मस्कत शहरात आयोजित केला जाऊ शकतो. या लिलावासाठी बीसीसीआयने २१ सप्टेंबर, ५ ऑक्टोबर आणि १७ ऑक्टोबर या तीन प्रमुख तारखा निवडल्या आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
बीसीसीआय लिलावासाठीचा आमंत्रण पत्रक ५ ऑक्टोबरपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध होईल आणि १७ ऑक्टोबरला लिलाव होण्याची शक्यता आहे. यामुळे हा ई-लिलाव नसल्याची खात्री झाली आहे.
काही एजन्सींसह काही मोठ्या कंपन्यांनी लिलावाच्या आमंत्रणाची कागदपत्रे खरेदी केल्याचे मानले जात आहे. त्यापैकी एक आरपीएसजी समूहाचे संजीव गोएंका आहेत, ते यापूर्वी पुणे फ्रँचायझीचे मालक होते. गोएंका लखनऊ संघ खरेदी करू शकतात.
त्यामुळे आयपीएल २०२२ पासून प्रत्येक हंगामात साखळी सामन्यांची संख्या आता १८ होईल. त्यापैकी नऊ सामने घरच्या आणि नऊ सामने बाहेरच्या मैदानावर खेळवले जातील. सध्या, लीगमध्ये आठ संघ आहेत आणि त्यांचे ७ सामने घरच्या मैदानावर खेळवले जातात तर आणि ७ बाहेरच्या मैदानावर खेळवले जातात. पण नवीन संघ सामील झाल्यानंतर स्पर्धेच्या एकूण सामन्यांची संख्या ७४ किंवा ९४ पर्यंत जाऊ शकते.
आर्थिक निकषांबाबत, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की प्रत्येक बोली लावणाऱ्या मालकाची एकूण किंमत २५०० कोटी रुपये आणि कंपनीची उलाढाल ३००० कोटी पर्यंत असावी. संघ खरेदी करण्याबाबत बीसीसीआय फक्त ३ भागीदारांना परवानगी देईल आणि त्यापैकी एकाला २५०० कोटी रुपयांची निव्वळ किंमत आणि ३००० कोटी रुपयांची उलाढाल असण्याचे वरील निकष पूर्ण करावे लागतील. वर नमूद केल्यानुसार मूळ किंमत २००० कोटी रुपये असेल.
बीसीसीआय सध्याच्या संघांना आपले खेळाडू कायम ठेवण्याच्या शक्यतेवर मौन बाळगून आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड, भारतीय आणि परदेशी खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी असलेल्या २ रिटेन्शन आणि २ राईट टू मॅच (आरटीएम) कार्डांना परवानगी देऊ शकतो. नोव्हेंबरपर्यंत याचा तपशील अंतिम केला जाईल, तर आयपीएलचा भव्य लिलाव जानेवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना योद्ध्यांच्या कामगिरीला आरसीबीचा सलाम, युएई टप्प्यातील पहिल्या सामन्यातून ‘असा’ करणार सन्मान
मितालीचे वनडे क्रमवारीतील ‘राज्य’ कायम, पण दक्षिण आफ्रिकेची ‘ही’ खेळाडू आली बरोबरीवर
फक्त एकच असा व्यक्ती आहे, जो कोहलीला कॅप्टन्सीवरुन हटवू शकतो; माजी क्रिकेटरने सांगितले नाव






