आशिया चषक 2023 या स्पर्धेच्या आयोजनाचा मुद्दा मागील काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानात होणार आहे. आता स्पर्धेच्या आयोजनावरून पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर आयोजित करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला भक्कम पाठिंबा मिळाला आहे. हा पाठिंबा श्रीलंका क्रिकेट आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मिळाला आहे. आता हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी धक्का मानला जात आहे.
जिओ स्पोर्ट्सनुसार जर आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर झाला, तर बांगलादेश आणि श्रीलंका दोन्ही देशांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी रस दाखवला आहे.
पाकिस्तानात होणार नाही आशिया चषक 2023?
लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी पाकिस्तामध्ये आपला संघ पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर होईल आणि ते या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाहीत.
यानंतर बीसीसीआयचे मन वळवण्यासाठी पाकिस्तानने पर्यायही सुचवण्याविषयीही चर्चा केली आहे. यामध्ये पाकिस्तान आशिया चषकातील सामन्यांचे आयोजन करेल आणि भारत त्यांचे सामने यूएईमध्ये खेळेल. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) या पर्यायावर सहमती दर्शवली नाहीये.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनीही म्हटले की, जर आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर झाला, तर या स्पर्धेत पाकिस्तान खेळणार नाही. जर पाकिस्तानने आशिया चषकात खेळण्यास नकार दिला, तर एसीसी त्यांच्या जागी यूएई संघाला स्पर्धेत सामील करून घेऊ शकते.
जय शाह यांनी ब्रॉडकास्टरच्या होणाऱ्या नुकसान भरपाईची योजनाही तयार केली आहे. बीसीसीआचे सचिव आणि एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी म्हटले की, पाकिस्तान न येण्यामुळे ब्रॉडकास्टर्सला जे नुकसान होईल, त्याची भरपाई भविष्यात भारतात कोणत्याही मालिकेच्या आयोजनाने केली जाईल.
अशात आता आशिया चषक 2023 स्पर्धेचे आयोजन नेमके कुठे होते, याविषयी प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. (bcci board gets support from sri lanka and bangladesh over moving asia cup out of pakistan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“समदमध्ये मला युवा युसूफ पठाण दिसतो”, माजी प्रशिक्षकांनी उधळली नव्या फिनीशरवर स्तुतीसुमने
“गंभीरने वादात पडायला नको होते”, ‘त्या’ घटनेवर दिग्गजाची प्रतिक्रिया






