भारताचे सर्वकालीन महान क्रिकेटपटू सुनील गावसकर शनिवारी (६ मार्च) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहेत. गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला शनिवारी पन्नास वर्ष पूर्ण झाली. या महत्त्वाच्या घटनेचे औचित्य साधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांचा भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सन्मानचिन्ह देत सत्कार केला.
बीसीसीआयने केला सन्मान
भारताचे सर्वकालीन महान फलंदाज व माजी कर्णधार सुनील गावसकर हे शनिवारी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची पन्नाशी पूर्ण करत आहेत. सुनील गावसकर यांच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल बीसीसीआयने त्यांचा सन्मान केला. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना झाला.
तिसर्या दिवसाच्या लंचदरम्यान बीसीसीआय सचिव जय शहा यांनी गावसकर यांना स्मृतिचिन्ह भेट देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. स्मृतिचिन्ह म्हणून दिलेल्या एका खास टोपीवर पुढील भागी ‘Celebrating 50 Years’ तर एका बाजूस गावसकर यांचा ‘टेस्ट कॅप नंबर’ असलेला १२८ हा क्रमांक तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या पदार्पणाची ६ मार्च १९७१ ही तारीख कोरली आहे.
तसेच यावेळी स्टँडमध्ये मोठे पोस्टर झळकावण्यात आले. ज्यावर लिहिले होते की गावसकर कसोटीमध्ये १० हजार धावा करणारे पहिले फलंदाज. तसेच त्यावर त्यांनी १० हजार धावा केल्या ती ७ मार्च १९८७ ही तारिख लिहिली होती. विशेष म्हणजे हा विक्रम गावसकरांनी अहमदाबामध्ये खेळतानाच केला होता.
Celebrating 50 years of Sunil Gavaskar's Test debut 👏👏
The cricketing world paid tribute to the legendary former India Captain Mr. Sunil Gavaskar on the occasion of his 50th anniversary of his Test debut for India. @Paytm #INDvENG
Full video 🎥 👉 https://t.co/k97YiyvcmR pic.twitter.com/za4Soq0yMh
— BCCI (@BCCI) March 6, 2021
It’s 50 years since India’s legendary opener #SunilGavaskar made his Test debut!@JayShah, the @BCCI honorary secretary, led the tributes by presenting Gavaskar with a special “Baggy Blue” 👏 pic.twitter.com/VihZOXUmmC
— ICC (@ICC) March 6, 2021
जय शहा यांनी केले ट्विट
सुनील गावसकर यांचा सत्कार केल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी त्या छोटेखानी समारंभाची काही छायाचित्रे शेअर करत ट्विट केले. त्यांनी त्यामध्ये लिहिले, ‘श्री सुनील गावस्कर जी यांच्या कसोटी पदार्पणाचा ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आम्ही भेटलो. ही सर्व भारतीयांसाठी एक महत्त्वपूर्ण घटना आहे आणि आम्ही ही घटना जगातील सर्वात मोठे क्रिकेट केंद्र असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये साजरी करीत आहोत.’
Join me in celebrating the 50th anniversary of Shri Sunil Gavaskar Ji's Test debut for 🇮🇳. It is indeed a momentous occasion for all Indians and we are getting to celebrate it at the world's largest cricket facility Narendra Modi Stadium 🏟️ @ICC @BCCI pic.twitter.com/NzolBqvKzI
— Jay Shah (@JayShah) March 6, 2021
गावसकर यांनी केले होते आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय पदार्पण
सुनील गावसकर यांनी आजच्या दिवशी म्हणजेच ६ मार्च या दिवशी १९७१ साली वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. पहिल्याच मालिकेत वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना त्यांनी चार सामन्यात चार शतकांच्या सहाय्याने ७७४ धावा काढल्या. गावसकर यांनी आपल्या १६ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १०,०२२ भावा आपल्या नावे केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भावा हे काय केलंस! विराटचा थ्रो लागला रूटच्या नाजुक भागी, मजेदार व्हिडिओ होतोय व्हायरल
अश्विन जिथे विक्रम तिथे! दुसऱ्या डावात बळींचा पंचक, दिग्गजांच्या मांदियाळीत आला ‘या’ स्थानी
आशिष नेहराचा ऑटोग्राफ घेत असलेल्या ‘त्या’ युवकाला ओळखलं का? आहे भारताचा मॅच विनर खेळाडू