भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आगामी टी-20 विश्वचषकात खेळणार नाहीये. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत देखील संधी दिली गेली नाहीये. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका बुधवारी, 28 सप्टेंबर रोजी सुरू झाली. उभय संघातील एकदिवसीय मालिका एकदिवसीय मालिका 6 ऑक्टोबर रोजी सुरू होईल. एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ अद्याप घोषित झाला नाहीये. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या एकदिवसीय संघात सॅमसनची वर्णी लागण्याचे संकेत दिले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील एकदिवसीय मालिकेत संजू सॅमसन (Sanju Samson) भारताचे नेतृत्व करत होता. कर्णधाराच्या रूपात त्याने यजमान भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. पाहुण्या न्यूजीलंड अ संघाला तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप (3-0) मिळाला. सॅमसनचे वैयक्तिक प्रदर्शन देखील या मालिकेत चांगले होते. याच पार्श्वभूमीवर त्याला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळेल, असे सांगितले जात होते. आता सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांच्याकडून सॅमसनला आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्याची संधी मिळणार आहे, याची एकप्रकारे पुष्टीच मिळाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी गांगुली स्वतः मैदानात उपस्थित होते. त्यावेळी त्यांना सॅमसनविषयी प्रश्न विचारले गेले. यावेळी गांगुली म्हणाले की, “सॅमसन चांगला खेळत आहे. तो भारतासाठी खेळला आहे. पण तो विश्वचषकाला मुकला. असे असले तरी, मला विश्वास आहे की, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी असेल. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठीही चांगले प्रदर्शन केले आहे. तो कर्णधार आहे, त्याने खूप चांगले प्रदर्शन केले आहे.”
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2022
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. दिग्गज शिखर धवन या संघाचा कर्णधार, तर सॅमसन उपकर्णधार असेल, अशाही चर्चा रंगल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चहर-अर्शमूळे दक्षिण आफ्रिका फर्शवर! सर्व प्रकारच्या टी20 मधील सर्वात लाजिरवाणी कामगिरी केली नावावर
विराट-रोहितमध्ये लागलीये महानतेची रेस! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोघांतच रंगणार ‘रनसंग्राम’