---Advertisement---

विराटच्या कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयावर पहिल्यांदाच बोलला बीसीसीआय अध्यक्ष गांगुली, चार ओळीत संपवला मॅटर

On: रविवार, जानेवारी 16, 2022 11:54 AM
Virat-Kohli-and-Sourav-Ganguly
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या आयुष्यात गेल्या ५ महिन्यांपासून बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहे. नुकतीच भारतीय संघाने त्याच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ च्या फरकाने गमावली. त्यानंतर शनिवारी (१५ जानेवारी) अचानक त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार (Virat Kohli Step Down As Test Captaincy) होणार असल्याचा धक्कादायक निर्णय घेतला. यापूर्वीच विराटने टी२० विश्वचषकानंतर स्वत:हून टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडले होते. तर त्यानंतर त्याच्याकडून वनडे संघाची कमानही काढून घेण्यात आली होती.

तेव्हापासून विराट आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांच्यात खटके उडाले असल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर पहिल्यांदाच गांगुलीची प्रतिक्रिया (Sourav Ganguly Reaction) पुढे आली आहे.

व्हिडिओ पाहा- 

द्रविडला 'जॅमी' टोपणनाव पडलं तरी कसं? | Story behind Rahul Dravid Nickname JAMMY

काय म्हणाला सौरव गांगुली?
विराटने कसोटी संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. यादरम्यान गांगुलीने विराटच्या निर्णयावर ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. गांगुलीने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने तिन्ही स्वरुपात शानदार प्रदर्शन केले आहे. हा विराटचा वैयक्तिक निर्णय आहे आणि बीसीसीआय त्याच्या निर्णयाचा सन्मान करते. तो आताही भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे आणि पुढेही राहिल. संघाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यात त्याचा मोलाचा वाटा पुढेही असाच राहिल. तो एक महान खेळाडू आहे.  

बीसीसीआयसोबत विराटचा होता विवाद!
मर्यादित षटकांच्या कर्णधारपदावरून विराट आणि बीसीसीआयमध्ये खटके उडाले होते. भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटकडून अचानक वनडे संघाचे नेतृत्त्वपद काढून घेण्यात आले होते. त्याच्या निर्णयावर बोलताना गांगुलीने म्हटले होते की, बीसीसीआयने त्याला टी२० संघाचे नेतृत्त्व सोडण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले होते.

मात्र यानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना विराटने गांगुलीच्या विधानाचे खंडन करत म्हटले होते की, टी२० संघाची कमान सोडण्याच्या आपल्या निर्णयावर त्याला बीसीसीआयमधून कोणीही पुनर्विचार करण्यास सांगितले नव्हते. यानंतर विराट आणि बीसीसीआयमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा झाल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

ऐकलंत का? धोनी नव्हे विराटने आपल्या मोठ्या निर्णयाविषयी सर्वात आधी ‘या’ व्यक्तीला दिलेली माहिती

भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या पहिल्याच अंंडर-१९ सामन्यात आला प्रकाशझोतात, ‘कांगारूं’ना करून दिली विजयी सुरुवात

कोणाच्या डोक्यावर सजणार कसोटी संघाच्या नेतृत्वाचा काटेरी मुकुट? रोहित, राहुल की अन्य कोण?

हेही पाहा-

कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही... बोलतोय 'किंग कोहली' । Virat Kohli Press Conference

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---