आजपासून (05 सप्टेंबर) यंदाच्या दुलीप ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची पहिली फेरी आज सकाळी 10 वाजता खेळवली जाणार आहे. दरम्यान आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नामवंत भारतीय खेळाडूंकडे लक्ष लागले आहे. ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व दाखवले आहे.
वास्तविक, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक खेळाडू विविध कारणांमुळे बाहेर पडले आहेत. आता हे तीन महत्त्वाचे खेळाडूही पहिल्या फेरीत सहभागी होणार नाहीत. ज्यामध्ये ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. बीसीसीआयने या तिघांना वगळल्याची माहिती दिली आहे. तर ईशानच्या जागी संजू सॅमसनचा ‘ड’ संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयने बुधवारी (04 सप्टेंबर) रात्री सोशल मीडियावर पोस्ट करत पुष्टी केली की यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन, फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा पहिल्या फेरीत खेळू शकणार नाहीत. बुची बाबू स्पर्धेत खेळताना ईशानच्या मांडीला दुखापत झाली आहे. त्याचवेळी सूर्यकुमार यादवलाही याच स्पर्धेत क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. हे दोघेही बीसीसीआयच्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. तर प्रसिध्द कृष्णा शस्त्रक्रियेनंतर अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तो देखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीसाठी संघांची घोषणा केली तेव्हा संजू सॅमसनचे कोणत्याही संघात नाव नव्हते. मात्र आता त्याचे नशीब चमकले असून तो पहिल्या फेरीत ईशान किशनची जागा घेणार आहे. त्याचवेळी टीम बी मध्ये समाविष्ट अष्टपैलू नितीश कुमारची निवड फिटनेसवर अवलंबून होती. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून खेळण्यासाठी तयार आहे.
दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीसाठी संघ
भारत अ: शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रायन पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएल राहुल, टिळक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, खलील अहमद, आवेश खान, व्ही कविरप्पा, कुमार कुशाग्रा , शास्वत रावत
भारत ब: अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन (यष्टीरक्षक)
भारत क : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडे (आर्यन, मयंक) , संदीप वारियर
भारत ड: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर), सौरभ कुमार , संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
हेही वाचा-
Paralympics 2024; क्लब थ्रोमध्ये भारताचा दुहेरी धमाका; एकाच स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यची कमाई
तिरंदाजीमध्ये देखील सुवर्णपदक; पॅरालिम्पिकमध्ये भारताला घवघवीत यश
उद्यापासून रंगणार दुलीप ट्राॅफीचा थरार, कधी आणि कुठे पाहायचे लाइव्ह सामने