गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रि्केट बोर्डात मोठ्या प्रमाणावर बदल होतं आहेत. जेव्हापासून भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष सौरव गांगुली झाला आहे तेव्हापासून अनेक चांगल्या गोष्टी होतं आहेत.
यातील एक चांगला निर्णय अर्थात म्हणजे विमानप्रवासावरील खर्च. जगात सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. अशातच बीसीसीआयने देशांतर्गत विमानप्रवासावरील खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढे देशांतर्गत प्रवास हा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना इकाॅनाॅमी क्लासने करावा लागणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या सिनीयर व ज्युनियर निवड समितीचे सदस्य हेच केवळ यापुढे देशांतर्गत विमानप्रवास बिजनेस क्लासने करु शकणार आहेत. बाकी सर्व अधिकारी ही इकाॅनाॅमी क्लासने प्रवास करणार आहेत.
या निर्णय़ाच्या अंमलबजावणीमुळे मंडळाचा मोठा पैसा वाचणार आहे. जेव्हा विमानप्रवास हा ७ तासांपेक्षा जास्त असेल तेव्हा मात्र सर्व अधिकारी हे बिजनेस क्लासने प्रवास करु शकतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
–हेल्मेट घालून गोलंदाजी करणारा अँड्र्यू एलिस निवृत्त
-एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
–आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?