भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आयोजित केलेल्या पहिल्या वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचे यशस्वी आयोजन मार्च महिन्यात केले होते. पाच संघांच्या झालेल्या या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावलेले. त्यानंतर आता या स्पर्धेतून झालेल्या कमाई बाबत बीसीसीआयने खुलासा केला आहे. पहिल्याच प्रयत्नात ही स्पर्धा यशस्वी झाल्याचे यावरून दिसून येते.
बीसीसीआयच्या कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी 2022-2023 या आर्थिक वर्षातील अहवाल सादर केला. त्या माहितीनुसार, बोर्डाने WPL मधून 377.49 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. शेलार यांच्या अहवालात केलेल्या उत्पन्नाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की 2022-2023 आर्थिक वर्षासाठी बीसीसीआयच्या एकूण उत्पन्नाच्या 6% WPL मधील होते. या कालावधीतील बीसीसीआयच्या उत्पन्नातील 37% वाटा इंडियन प्रीमियर लीगमधून आला.
या अहवालानुसार,
अहवालानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात 4,360.57 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत बीसीसीआयने 2022-2023 या आर्थिक वर्षात 6,558.80 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले.
(BCCI earned a revenue of 377.49cr from the inaugural season of the WPL)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपच्या सर्वच VIP सामन्यांचे यजमानपद मिळालेले श्री नरेंद्र मोदी स्टेडियम
‘किलर मिलर’ ठरणार वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा तारणहार? त्याची बॅट भारतात बोलतेच