---Advertisement---

उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाच्या वेळापत्रकात होणार पुन्हा बदल?

On: सोमवार, जून 28, 2021 7:00 PM
---Advertisement---

भारतीय लोकांसाठी क्रिकेटचा उत्सव म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग(आयपीएल). जगातील सर्वाधिक सर्वात जास्त महागडी व्यवसायिक स्पर्धा म्हणून आयपीएलला ओळखले जाते. २०२१च्या आयपीएल मोसमाला मे महिन्याच्या सुरुवातीला २९ सामन्यांनंतर कोविड -१९ च्या वाढत्या संक्रमानामुळे स्तगिती देण्यात आली होती. आता हा उर्वरित मोसम संयुक्त अरब अमिराती(युएई) येथे १९ सप्टेंबर पासून १५ ऑक्टोबरपर्यंत खेळवण्यात येणार आहे. पण हल्लीच आलेल्या माहिती नुसार बीसीसीआय पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्याची शक्यात आहे.

यंदाची आयपीएल स्पर्धा भारतात सुरु झाली होती. परंतु, २९ सामन्यानंतर वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे स्पर्धेला स्थगिती देण्यात आली होती. आयपीएल मधल्या कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचे अधिक खेळाडू कोरना संक्रमित आढळून आल्याने बीसीसीआयने कुठलाही वेळ न वाया घालवता लगेचच चालू असलेली स्पर्धा स्थगित केली होती.

आता हा हंगाम सप्टेंबरमध्ये सुरु होईल. पण या स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआय आयपीएल स्पर्धा आयोजन करण्यासाठी सतत युएई सरकारच्या संपर्कात आहेत. बीसीसीआयचे म्हणणे आहे की, इंग्लंडमध्ये कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सरळ युएईमध्ये येऊन जैवसुरक्षा आणि विलगीकरणात राहावे, यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न चालू आहेत. आता हे पाहणे आयपीएल प्रेमींसाठी उत्सुकतेचे ठरेल की, त्यांना पुन्हा एकदा उर्वरित सामन्यांसाठी वाट पहावी लागते की, जसे नियोजिक वेळापत्रकाप्रमाणे १९ सप्टेंबरपासून उर्वरित हंगाम सुरु होतो.

इंग्लड विरुद्ध भारत संघातील ५ सामन्यांची कसोटी मालिका १४ सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर लगेचच खेळाडूंना १९ सप्टेंबरपासून आयपीएल खेळण्यासाठी उपलब्ध राहावे लागेल.

आयपीएल २०२१च्या झालेल्या २९ सामन्यांपर्यंत दिल्ली कॅपीटल्स संघाने गुणतालिके अव्वल स्थान राखले आहे. त्यांच्यामागे चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. तसेच दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक ३८० धावा केल्या आहेत. तर आरसीबी संघाचा हर्षल पटेल याने गोलंदाजीत १७ बळी काढून गोलंदाजाच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘आता माझं डोकं खाण्याची वेळ झाली’, जेव्हा एमएस धोनी करतो पत्नी साक्षीची मस्करी, ट्विट होतंय व्हायरल

श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळून भारतीय संघाला नाही काहीही फायदा? ‘हे’ आहे कारण

“मोठी विजेतीपदं जिंकणाऱ्या कर्णधाराला लोक नेहमीच लक्षात ठेवतात”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---