भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. धोनीला जेव्हा सामन्यांमधून वेळ मिळतो तेव्हा तो रांचीमधील आपल्या फार्महाऊसवर परिवारासोबत वेळ घालवत असतो. धोनीला परिवारासोबत वेळ घालवायला खूप आवडते. अनेकदा धोनीनी परिवारासोबत वेळ घालवत असतानाचे फोटो किंवा व्हिडिओ त्याची पत्नी साक्षी सोशल मीडियाच्या अकाउंटवर शेअर करत असते. पण धोनी जरी जास्त सोशल मीडियावर पोस्ट करत नसला तरी त्याचे 10 वर्षांपूर्वीचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे.
धोनीचे मोठ्या प्रमाणात आहेत फॉलोवर्स
महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियाचा जास्त वापर करत नाही. तरीदेखील धोनीला अनेक चाहते सोशल मीडियावर फॉलो करतात. धोनीचे ट्विटरवर (Twitter) 8.2 मिलियन, फेसबुकवर (Facebook) 26 मिलियन आणि इंस्टाग्रामवर (Instagram) 33.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.
धोनीने केली पत्नीची मस्करी
महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीची मस्करी करणारे एक ट्विट 10 वर्षांपूर्वी केले होते. हे ट्विट त्याने 5 नोव्हेंबर 2011 मध्ये केले होते. त्या ट्विटमध्ये असे लिहिले होते की, ‘शेवटी आजच्या दिवसातील सर्व कामे माझी संपली आहेत. पत्रकार परिषद, संघाची मीटिंग, सामना पंचाची मीटिंग ही सर्व कामे संपली आहेत. त्यामुळेच माझ्या पत्नीने विचार केले आहे की, आता माझे डोकं खाण्याची वेळ आहे.’
https://twitter.com/msdhoni/status/132823592646885376
शिमलामध्ये सुट्टीचा घेतला आनंद
महेंद्रसिंग धोनीने नुकताच हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत सुट्टीचा आनंद घेतला. धोनीने शिमलामध्ये सुट्टीचा आनंद घेत असतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर साक्षी धोनीने शेअर केले होतो.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मागीलवर्षी निवृत्ती घेतली आहे. पण तो आयपीएलमध्ये खेळतो. त्यामुळे तो आता आपल्या सर्वांना आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांमध्ये मैदानावर दिसणार आहेत. आयपीएल 2021 चे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळून भारतीय संघाला नाही काहीही फायदा? ‘हे’ आहे कारण
“मोठी विजेतीपदं जिंकणाऱ्या कर्णधाराला लोक नेहमीच लक्षात ठेवतात”
‘या’ कारणामुळे श्रीलंका दौरा अत्यंत महत्त्वाचा, टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने मांडले मत






