भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा गुरूवारी (२९ जुलै) संपला. वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला टी२० मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी दुसऱ्या सामन्याआधी भारताच्या ९ क्रिकेटपटूंना क्वारंटाईन व्हावे लागले होते. त्यातच, दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त झाला होता. आता त्याच्या या दुखापतीविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
सैनीच्या दुखापतीवर बीसीसीआयची प्रतिक्रिया
बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘२८ जुलै रोजी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० मध्ये क्षेत्ररक्षण करताना नवदीप सैनीच्या खांद्याला दुखापत झाली. दुखापतीचे नक्की स्थान शोधण्यासाठी त्याचे स्कॅन करणे आवश्यक आहे. वैद्यकीय पथक त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवतेय.’
कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आठ भारतीय खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आले होते. ज्यामुळे दुसर्या टी२० भारतीय संघाने चार गडी राखून सामना गमावला. भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले की, “वैद्यकीय पथक नवदीपच्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. आम्ही परिस्थितीचे आकलन करू आणि त्यानुसार निर्णय घेऊ. निर्णय झाल्यावर निवडकर्ते आणि प्रशिक्षक यांना कळवले जाईल.”
दुसऱ्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे नवदीप सैनीला तो सामना तसेच मालिकेतील अखेरच्या सामन्यालाही मुकावे लागले होते.
UPDATE: Navdeep Saini suffered a left shoulder injury while fielding during the second T20I vs Sri Lanka on 28th July.
He might have to undergo scans to ascertain the extent of injury. His progress is being monitored by the medical staff.#TeamIndia #SLvIND
— BCCI (@BCCI) July 29, 2021
तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव
वनडे मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर श्रीलंकेने टी२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांना पहिल्या सामन्यात ३८ धावांनी पराभव पाहावा लागला होता. मात्र, त्यानंतर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघावर त्यांनी सलग दोन सामन्यात विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकाआधी हा विजय सततचे पराभव पाहणाऱ्या श्रीलंका संघासाठी नवसंजीवनी ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियनच्या ताफ्यात नव्या भारतीय सदस्याची एंट्री, नावावर आहेत ५००पेक्षा जास्त विकेट्स
‘हे’ ३ भारतीय फलंदाज आहेत ‘लंबी रेस का घोडा’! मोडू शकतात सचिनचा मोठा विश्वविक्रम
असे ४ प्रसंग, जेव्हा कसोटी सामन्यात एकाच दिवशी बनल्या होत्या ५०० हून जास्त धावा