---Advertisement---

बीसीसीआयचा कौतुकास्पद निर्णय! प्ले-ऑफच्या प्रत्येक डॉट चेंडूवर करणार ‘हे’ काम

---Advertisement---

मंगळवारी (दि. 23 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवरील या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला‌. या सामन्यापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक कौतुकास्पद अभियानाला सुरुवात केली.

पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईचा संघ फलंदाजीला आल्यानंतर मोहम्मद शमी हा पहिले षटक टाकत होता. त्याने आपल्या पहिल्या षटकात जे निर्धाव चेंडू टाकले त्याच्याजागी एका बिंदू ऐवजी झाडाचे चित्र दिसले. अचानक हा बदल पाहून सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करत हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1661014299152875527?t=RyOj_WWEzSZ0QXpGRf3B0Q&s=19

 

याबाबत माहिती घेतली असता समजते की, प्ले ऑफ्समध्ये जितके निर्धाव चेंडू टाकले जातील त्या प्रत्येक निर्धाव चेंडूसह बीसीसीआय तब्बल 500 झाडांची लागवड करणार आहे. याचाच अर्थ प्ले ऑफ्सच्या चार सामन्यांमध्ये जर 100 निर्धाव चेंडू टाकले गेले तर, बीसीसीआयकडून देशभरात 50,000 झाडे लावण्यात येतील

बीसीसीआयवर सामाजिक उपक्रमात सहभागी न होण्याचा आरोप लावला जातो. मात्र, त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. क्वालिफायर एक चा सामना पाहण्यासाठी चेन्नई येथे बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, बीसीसीआय सचिव जय शहा, खजिनदार आशिष शेलार हे पदाधिकारी उपस्थित होते.

पहिल्या क्वालिफायरनंतर मुंबई इंडियन्स व लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील एलिमिनेटर सामना देखील ‌ चेन्नई येथेच खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा क्वालिफायर व अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.

(BCCI going to plant 500 Trees for each dot-ball in IPL Playoffs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Qualifier 1: टॉसचा निकाल पंड्यासेनेच्या पारड्यात, CSK देणार का कडवी झुंज?
प्ले ऑफ्स किंग होता रैना! धडाकेबाज कामगिरीने सार्थ केलेले मि.आयपीएल नाव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---