मंगळवारी (दि. 23 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी उभय संघात 7 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकत पंड्यासेना अंतिम सामन्यात पोहोचण्याचा प्रयत्न करेल.
गुजरात टायटन्स संघात एक बदल आहे. यश दयाल संघातून बाहेर पडला असून त्याच्या जागी संघात दर्शन नळकांडे याची एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स संघ आहे त्याच संघासोबत मैदानात उतरणार आहे.
🚨 Toss Update 🚨@gujarat_titans win the toss and elect to field first against @ChennaiIPL.
Follow the match ▶️ https://t.co/LRYaj7cLY9 #TATAIPL | #Qualifier1 | #GTvCSK pic.twitter.com/Bhj5g0Gv30
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
उभय संघांची आयपीएल 2023मधील कामगिरी
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गुजरातने साखळी फेरीत 14 सामने खेळले. त्यापैकी 10 सामन्यात त्यांनी विजय मिळवला, तर उर्वरित 4 सामने त्यांना गमवावे लागले. 10 विजयांमुळे गुजरातने साखळी फेरीचा शेवट 20 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी राहून केला. दुसरीकडे, 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिलेला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने 14 सामने खेळताना 8 सामने जिंकले. तसेच, 5 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे त्यांना त्या सामन्याचा एक गुण मिळाला.
आमने-सामने आकडेवारी
चेन्नई विरुद्ध गुजरात (Chennai vs Gujarat) संघातील आमने-सामने आकडेवारी पाहायची झाली, तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात संघ चेन्नईवर भारी पडल्याचे दिसते. आतापर्यंत दोन्ही संघ तीन वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी दोन सामने आयपीएल 2022मध्ये खेळले गेले होते, तर एक सामना आयपीएल 2023मध्ये पार पडला. या तिन्ही सामन्यात चेन्नईच्या वाट्याला पराभवच आला. त्यामुळे आता या सामन्यातही गुजरातचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. (Qualifier 1 Gujarat Titans have won the toss and have opted to field against Chennai Super Kings)
पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी गुजरात प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महीश थीक्षणा
गुजरात टायटन्स
शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), दसून शनाका, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्ले ऑफ्स किंग होता रैना! धडाकेबाज कामगिरीने सार्थ केलेले मि.आयपीएल नाव
ऋतुराज गुजरातविरुद्ध अपयशी ठरावा! ही आकडेवारी पाहून सीएसके फॅन्स असंच म्हणतील