---Advertisement---

संघ हरला तरी टीम इंडिया मालामाल! बीसीसीआयला मिळाला नवा स्पॉन्सर; इतके कोटी पडणार पदरात

On: सोमवार, सप्टेंबर 5, 2022 10:56 PM
Team India
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषक खेळतोय. सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तान कडून पराभूत व्हावे लागले. सोशल मीडियावर भारतीय संघाला लक्ष केले जात आहे. असे असले तरी भारतीय क्रिकेटवर याचा काहीही परिणाम झाला नाही. या सर्व घडामोडीत भारतीय संघाला एक नवा प्रायोजक ही लाभला आहे.

अलीकडच्या काही दिवसांत बीसीसीआयसोबत प्रदीर्घ काळापासून संलग्न असलेली व भारतातील सर्व देशांतर्गत स्पर्धा आणि मालिकांचे प्रायोजक असलेल्या पेटीएमने बीसीसीआयसोबतचा करार मध्यातच संपवण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात कंपनीने बोर्डाला निवेदन दिले होते, जे बीसीसीआयने मान्य केलेले. 2023 पर्यंत चालणारा हा करार आता संपुष्टात आला असून, जगातील आघाडीची वित्त कंपनी मास्टरकार्डला प्रायोजकत्वाचे अधिकार प्राप्त झाले आहेत.‌ बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

मास्टर कार्ड ही जगातील नामवंत कंपनी असून, विश्वभरातील अनेक प्रमुख क्रीडा स्पर्धांना ते प्रायोजकत्व देतात. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी तसेच सचिन तेंडुलकर हे देखील मास्टरकार्डचे भारतातील ब्रँड अँबेसिडर होते.

भारताच्या पुढील घरगुती मालिकेपासून मास्टरकार्ड पेटीएमची जागा घेईल. 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियन संघासोबत टी20 मालिकेने त्याची सुरुवात होईल. केवळ आंतरराष्ट्रीय मालिकाच नाही तर मास्टरकार्ड देशांतर्गत स्पर्धा विशेषत: रणजी करंडक स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक असेल. बीसीसीआयने प्रायोजकत्व करार हस्तांतरित करण्याची पेटीएमची विनंती स्वीकारली होती. मात्र, यामुळे प्रायोजकत्व कराराचे मूल्य बदलणार नाही. मास्टरकार्ड प्रति सामन्यासाठी 3.8 कोटी रुपये देईल. पेटीएमने 2019 मध्ये त्यांनी याच किमतीत हा करार केला होता. या कराराची वैधता 2023 पर्यंत होती. मात्र, असे असतानाही, थोड्या अधिक पैशांची भर बीसीसीआयच्या तिजोरीत पडणे अपेक्षित आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार, प्रायोजकत्व हस्तांतरणा वेळची 5 टक्के रक्कम देखील जमा केलीये.

महत्वाच्या बातम्या – 
जेमिमाला ‘बर्थ डे’ गिफ्ट! वुमेन्स आयपीएलमध्ये खेळणार मुंबई इंडियन्ससाठी?
VIDEO: जेव्हा टीम इंडिया हारत होती, तेव्हा पाकिस्तानच्या ड्रेसिंगरुममध्ये नक्की चाललं काय होतं?
रिषभ की कार्तिक? कोण आहे टीम इंडियाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक? चाहते विचारतायेत प्रश्न  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---