भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यापुढे कोणत्याही खेळाडूला सूट देणार नाही, असे दिसते. क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंसाठी देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची रणजी ट्रॉफी खेळणे सक्तीचे केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार ईशान किशन, कृणाल पंड्या आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयकडून रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सुचना केल्या गेल्या आहेत.
ईशान किशन, कृणाल पंड्या आणि श्रेयस अय्यर या तिघांसह इतरही खेळाडू आहेत, जे सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नाहीत. सध्या रणजी ट्रॉफी 2024 हंगाम सुरू आहे. या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत सर्व संघ आपल्या परीने चांगले प्रदर्शन करत आहेत. पण देशांतर्गत क्रिकेटच्या या थरारात अनेक खेळाडूंना सहभाग घ्यायचाच नाहीये. मागच्या मोठ्या काळापासून बीसीसीआय या खेळाडूंवर लक्ष ठेवून आहे. आता अखेर क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघातून बाहेर असणाऱ्या सर्व खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सुचना केल्या आहेत.
रणजी ट्रॉफी न खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सर्वाधिक चर्चेत असेलेल नाव ईशान किशन (Ishan Kishan) याचे आहे. कारण ईशानने चालू रणजी हंगामातील एकही सामना खेळला नाहीये. विशेष म्हणजे ईशाने डिसेंबर 2023 मध्ये वेळापत्रक व्यस्त असल्याचे कारण देत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतली होती. अशात आता ईशानला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळावी लागणार आहे. बीसीसीआयने तशा सुचनाही केल्या आहेत.
क्रिकेबजच्या वृत्तानुसार बीसीसीआयने संघातून बाहेर असलेल्या खेळाडूंना ई-मेल केला आहे की, त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये सहभाग घ्यावा. माध्यमांशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने असेही सांगितले की, “खेळाडू फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएलला महत्व देत आहेत. हे योग्य नाही. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटसाठीही वेळ काढला पाहिजे. आपल्या राज्याच्या संघाप्रती त्यांनी सन्मान दाखवला पाहिजे.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेपटू आकाश चोप्रा यानेही राष्ट्रीय संघातून बाहेर असणाऱ्या खेळाडूंविषयी परखड मत मांडले. आकाश चोप्राच्या मते, जे खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत, त्यांना भारतीय संघात संधी मिळाली नाही पाहिजे. माजी सलामीवीराच्या मते खेळाडूंचा असा समज आहे की, आयपीएल प्रदर्शनाच्या जोरावर ते भारतीय संघात जागा बनवतील. चोप्राने यावेळी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांचे उदारहण देखील दिले, जे यावेळी रणजी ट्रॉफी खेळत आहेत. (BCCI has advised Ishan Kishan along with some other players to play Ranji Trophy)
महत्वाच्या बातम्या –
‘नेक्स्ट धोनी’ अशी ओळख असणारा सौरभ तिवारीची क्रिकेटमधून निवृत्त, मिळाली फक्त तीन वनडे खेळण्याची संधी
IND vs ENG । सरफराज खानचे कसोटी पदार्पण होणार! राजकोट कसोटीत चमकणार युवा खेळाडूची नशीब