Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केएल राहुलला सोडावे लागले उपकर्णधारपद, रोहितकडून ‘या’ तिघांपैकी एकाला मिळणार मोठी जबाबदारी

केएल राहुलला सोडावे लागले उपकर्णधारपद, रोहितकडून 'या' तिघांपैकी एकाला मिळणार मोठी जबाबदारी

February 20, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिल्ली कसोटी सामना रविवारी (19 फेब्रुवारी) निकाली निघाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने लागोपाठ विजय मिळवला आणि पाहुण्या ऑस्ट्रेलियावर 2-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये पुन्हा चाहत्यांची निराशा करताना दिसला. परिणामी राहुलकडून संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले.

बीसीसीआयने बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी याआधी संघ घोषित केला होता. या दोन सामन्यांसाठी केएल राहुल (KL Rahul) संघाचा उपकर्णधार म्हणून खेळत होता. पण मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात मात्र राहुलकडून भारतीय संघाचे उपकर्णधारपद काढून घेतले गेले. रविवारी बीसीसीआयने बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ घोषित केला. राहुलच्या नावापुढे नेहमी लिहिले जाणारे उपकर्णधारपद यावेळी मात्र नव्हते. आता बीसीसीआयने राहुलकडून ही जबाबदारी काढून घेतलीच आहे, तर प्लेइंग इलेव्हनमधून देखील त्याला वगळण्यात येऊ शकते.

India’s squad for 3rd & 4th Test vs Australia

Rohit Sharma (C), KL Rahul, S Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli, KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, Axar Patel, Kuldeep Yadav, R Jadeja, Mohd Shami, Mohd Siraj, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Umesh Yadav, Jaydev Unadkat

— BCCI (@BCCI) February 19, 2023

केएल राहुल भारताच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. पण मागच्या मोठ्या काळापासून तो धावा करण्यासाठी झगडताना दिसला आहे. यादरम्यानच्या काळात त्याच्या सुमार प्रदर्शनाचा तोटा संघाला देखील झाला. पण आता राहुलच्या जागी शुबमन गिल रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. पण प्रश्न संघाच्या उपकर्णदारपदाचा आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार रोहित लवकरच संघासाठी नवीन उपकर्णधार नियुक्त करू शकतो. संघाचा उपकर्णधार बनण्यासाठी त्या खेलाडूची प्लेइंग इलेव्हनमधील जागा नेहमी पक्की हवी अशते. अशात रोहितपुढे सध्या श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे तीन प्रमुख पर्याय उपकर्णधारपदासाठी असल्याचे दिसते. या तिन्ही खेळाडूंनी अलिकडच्या काळात चांगले प्रदर्शन केले असून उपकर्णधारपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतात.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
(BCCI has removed KL Rahul as the vice-captain of the Indian team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ दोन कारणांमुळे दिल्लीतही ऑस्ट्रेलियाने गमावला सामना, चूक फलंदाजांचीच!
टीम इंडियाच्या दणदणीत विजयानंतर बदलले WTC क्रमवारीचे गणित, फायनलसाठी आता…


Next Post
Indian Womens Team

विश्वचषकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताकडे शेवटची संधी, जाणून घ्या कशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

Australia Cricket Team

तिसऱ्या-चौथ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियासाठी विजय कठीण! प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार

Ashwin Viral Video

अश्विनच्या या कृत्यामुळे मोठमोठ्याने हसू लागला विराट कोहली, ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रिएक्शनही पाहण्यासारखी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143