भारतीय क्रिकेट संघ एक आठवड्यापासून ऑस्ट्रेलियात वात्स्यव्यास आहे. या दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. संघातील खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहे. त्याचबरोबर संघातील खेळाडू सरावही करत आहेत.
दुखापतीमुळे अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा भारतीय संघाचा भाग नाही. पण तो कसोटी मालिकेपर्यंत तंदुरुस्त होऊन ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दोन वर्षाच्या दीर्घ काळानंतर भारतीय संघाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहे.
नुकताच बीसीसीआय.टीव्हीच्या एका प्रतिनिधीने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने गोलंदाजीच्या विविध मुद्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या आयपीएलच्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना तू आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. या हंगामात तू तब्बल 20 बळी घेतले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमधील तुझी कामगिरी अभूतपूर्व होती. त्या कामगिरीने विश्वचषकात तू अफगाणिस्तानविरुद्ध घेतलेल्या हॅटट्रिकची आठवण करून दिली.
यावर बोलताना शमी म्हणाला की, “दोन अत्यंत स्फोटक फलंदाजांविरुद्ध (रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक) सुपर ओव्हरमध्ये फक्त 5 धावांचा बचाव केल्याने मी समाधानी आहे. छोटया लक्ष्याचा बचाव करताना तुम्हाला अचूकपणे गोलंदाजी करावी लागते.मला वाटत नाही की अशा प्रकारच्या उच्च-दर्जाच्या फलंदाजांविरुद्ध आम्हाला इतर कुणीही संधी दिली असती. मी आशावादी आहे आणि माझ्या कौशल्यावर मला विश्वास आहे. जेव्हा आपण यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा चेंडू फुल टॉस जाण्याचा धोका असतो. मी हे काम अचूकपणे करू शकलो याबद्दल आनंदी आहे.”
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अगदी भारतातही या संघाने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे.
गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलताना शमी म्हणाला की, “भारतीय गोलंदाजी विभागात एकमेकांविषयी विश्वासाची भावना आहे आणि मैत्रीचं एक घट्ट नातं आहे. याच कारणामुळे आम्हाला यश मिळवता आलं. प्रत्येक गोलंदाजांमधील सामर्थ्यावरही हे अवलंबून आहे. आरोग्यदायी स्पर्धा आहे पण गटात कोणतीही स्पर्धा नाही. आम्हा सर्वांचं एकच ध्येय आहे आणि आम्ही सर्व ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत आहोत. संघात एक मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे.”
“जर आपण आकडेवारी पहिली, तर आम्ही मागील काही वर्षात परदेश दौऱ्यावरील जवळपास सर्वच कसोटी सामन्यात 20 बळी घेण्यात यशस्वी झालो आहोत. देशात खेळलेल्या फ्रीडम करंडक स्पर्धेत किंवा गुलाबी-चेंडूने खेळलेल्या कसोटीतही वेगवान गोलंदाजी विभाग खूप प्रभावी ठरला. आम्ही सतत एकमेकांशी चर्चा करत असतो. आम्ही सांघिक कामगिरी केली आहे.” असेही पुढे बोलताना शमी म्हणाला
सन 2018-19 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली होती. या विजयात भारतीय गोलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता आगामी मालिकेत आव्हान मोठे असेल.
या मुद्द्यावर बोलताना शमी म्हणाला की, “आमचा वेगवान गोलंदाजी विभाग ताशी 140 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकतो आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या वेगवान गोलंदाजीची आवश्यकता आहे. आम्हाला आव्हानांचा सामना करायला आवडते. आम्हाला अनुभव आहे. आमच्या फिरकी गोलंदाजी विभागातही विविधता आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवान गोलंदाजी करू शकतो, आमचं कौशल्यही भिन्न आहे.”
“भारताकडे दर्जेदार फलंदाज आहेत आणि आम्ही त्यांच्याविरुद्ध नेटमध्ये गोलंदाजी करतो. आम्ही दिग्गज फलंदाज असला तरीही गोलंदाजी करताना त्याच्या नावाचा फार विचार करत नाही.आम्ही आपल्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतो. आपण जागतिक दर्जाचे फलंदाज असले तरीही, एका चांगच्या चेंडूवर तुम्ही बाद होऊ शकता.”असेही पुढे बोलताना शमी म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
वडिलांच्या निधनानंतर सिराजने ‘हा’ कठोर निर्णय घेत नाकारला बीसीसीआने दिलेला पर्याय
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात
ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये १७६ सामने खेळलेल्या खेळाडूला मिळाली लंका प्रीमियर लीगमध्ये संधी