---Advertisement---

अबब! बीसीसीआयने भरला हजारो कोटींचा इन्कम टॅक्स, आकडे पाहून चक्रवाल

On: बुधवार, ऑगस्ट 9, 2023 6:01 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2021-22 मध्ये 1,159 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. बीसीसीआयने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 37 टक्के अधिक आयकर भरला आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बीसीसीआयने भरलेल्या आयकराची माहिती दिली. यामध्ये रिटर्न फायलींगच्या आधारे मागील पाच वर्षातील खर्च आणि उत्पन्नाचा तपशील देण्यात आला आहे.

2019-20 नंतर आयकर वाढला आहे. कारण त्यानंतर कोविड-19 महामारीमुळे बीसीसीआयला मोठा खर्च करावा लागलेला. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट या काळात बंद झाले होते. त्यामुळे स्पर्धा आयोजनासाठी लागणाऱ्या बायो-बबलमूळे अतिरिक्त खर्च करावा लागला होता.

2020-21 मध्ये बीसीसीआयने 844.92 कोटी रुपयांचा आयकर भरलेला. जो 2019-20 मध्ये भरलेल्या 882.29 कोटी रुपयांच्या तुलनेत कमी होता. 2019 आर्थिक वर्षात, बोर्डाने 815.08 कोटी रुपयांचा कर भरला, जो 2017-18 मध्ये भरलेल्या 596.63 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता.

2021-22 या आर्थिक वर्षात बीसीसीआयला 7606 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यांचा खर्च सुमारे 3064 कोटी रुपये होता. 2020-21 मध्ये बीसीसीआयची कमाई 4735 कोटी रुपये होती तर खर्च 3080 कोटी रुपये होता.

बीसीसीआय सध्या वनडे विश्वचषक 2023 च्या तयारीत व्यस्त आहे. वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान भारतात आयोजित केला जाईल. हे माहित आहे की, वनडे विश्वचषक फेब्रुवारी ते मार्च 2023 दरम्यान होणार होता. परंतु कोवि-19 महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आलेला.

(BCCI Income Tax In 2021-2022 Is 1159 Crores)

महत्वाच्या बातम्या- 
नादच खुळा! शुबमन गिलची वनडे रँकिंगमध्ये गरुडझेप, टॉप 5 फलंदाजांमध्ये एकटाच भारतीय
कुलदीपचा भीमपराक्रम! 3 विकेट्स घेताच मोडून टाकला चहलचा ‘हा’ मोठा Record, लगेच वाचा 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---