---Advertisement---

एमएसके प्रसादचा कार्यकाळ संपला; बीसीसीआयने मागविले निवड समीतीमधील या जागांसाठी अर्ज…

On: रविवार, जानेवारी 19, 2020 4:22 PM
---Advertisement---

शनिवारी (18 जानेवारी) बीसीसीआयने वरिष्ठ निवड समीतीतील दोन जागांसाठी अर्ज मागविले आहे. यामध्ये निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि त्यांचे सहकारी गगन खोडा यांची जागा रिक्त झाली आहे. त्यांचा कार्यकाळ याचवर्षी संपत आहे.

तसेच या निवड समीतीतील सरनदीप सिंग, जतिन परांजपे आणि देवांग गांधी हे समीतीत कायम राहणार आहेत.  त्यांचा कार्यकाळ 2020 च्या अखेरीस संपेल.

त्याचबरोबर बीसीसीआयने वरिष्ठ निवड समितीबरोबच वरिष्ठ महिला निवड समितीतील 5 जागांसाठीही अर्ज मागवले आहेत. तसेच कनिष्ठ (ज्यूनियर) पुरुष निवड समितीमध्येही 2 जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्यासाठीही अर्ज मागवले आहे.

हे अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही अटीही बीसीसीआयने ठेवल्या आहेत. तसेच हे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी असणार आहे.

राष्ट्रीय निवडकर्ता पदांसाठी पात्रतेच्या अटी खालीलप्रमाणे-

राष्ट्रीय निवडकर्ता (वरिष्ठ पुरुष)- 

-7 कसोटी सामने खेळले असावे किंवा

-30 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावे किंवा

-10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावे

-सर्व क्रिकेट प्रकारातून कमीतकमी 5 वर्षांपूर्वी निवृत्ती घेतलेली असावी.

– वयोमर्यादा – 60 वर्षे

राष्ट्रीय निवडकर्ता (वरिष्ठ महिला)-

-भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलेले असावे

-सर्व क्रिकेट प्रकारातून कमीतकमी 5 वर्षांपूर्वी निवृत्ती घेतलेली असावी

-वयोमर्यादा – 60 वर्षे

राष्ट्रीय निवडकर्ता (कनिष्ठ पुरुष)-

-25 प्रथम श्रेणी सामने खेळले असावेत

-सर्व क्रिकेट प्रकारातून कमीतकमी 5 वर्षांपूर्वी निवृत्ती घेतलेली असावी

-वयोमर्यादा – 60 वर्षे

https://twitter.com/Maha_Sports/status/1218540925640531969

https://twitter.com/Maha_Sports/status/1218521280128802817

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---