येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Indian Premier League 2022 ) स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. भारतात कोरोनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गेल्या २ वर्षांपासून ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जात आहे. आगामी हंगाम भारतात खेळवणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु, भारतात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ज्यामुळे बीसीसीआय (BCCI) ‘प्लॅन बी’ अवलंब करू शकते. काय आहे प्लॅन बी? चला जाणून घेऊया.
बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा श्रीलंका (Sri Lanka) किंवा दक्षिण आफ्रिकेत (South Africa) खेळवली जाऊ शकते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआय शेवटपर्यंत प्रयत्न करतेय की, ही स्पर्धा भारतात आयोजित केली गेली पाहिजे. असे झाल्यास बीसीसीआयला सर्व सामन्यांचे आयोजन एकाच शहरात करावे लागेल. जेणेकरून खेळाडूंना एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्याची आवश्यकता भासणार नाही.
गतवर्षी देखील बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेचे आयोजन भारतात केले होते. या स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला होता. परंतु, ज्यावेळी अहमदाबाद आणि दिल्लीतील सामन्यांना सुरुवात झाली, त्यावेळी खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. परिणामी बीसीसीआयला ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली होती. या स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये पार पडला होता.
बीसीसीआयने प्लॅन बी देखील तयार ठेवला आहे. प्लॅन बी नुसार भारतात या स्पर्धेचे आयोजन करता आले नाही, तर ही स्पर्धा श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाऊ शकते. परंतु, भारतात आयपीएल स्पर्धा खेळवणे हे बीसीसीआयचे प्राथमिक ध्येय असणार आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपद मिळवले होते. आता पुढील आयपीएलचे जेतेपद मिळवण्यासाठी ८ नव्हे तर १० संघ संघर्ष करताना दिसून येणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बापरे! रस्त्यावर चणे विकतोय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज, पाहा व्हिडिओ
हे नक्की पाहा: