fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

८ नोव्हेंबर नाही तर या दिवशी होऊ शकते आयपीएल२०२० ची फायनल

July 31, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

Photo Courtesy: Twitter/ mipaltan


मुंबई । यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी20 विश्वचषक आयसीसीने पुढे ढकलला आहे. म्हणून आयपीएल 2020 आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वृत्तानुसार, यावर्षी आयपीएल 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळला जाईल. पूर्वी 8 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला जाईल, असे सांगितले जात होते, पण आता ही तारीख बदलू शकते असे सांगण्यात येत आहे.

स्पर्धा सुरु होण्याच्या तारखेमध्ये कोणताही बदल झालेला नाही परंतु अंतिम सामना 8 ऐवजी 10 नोव्हेंबरला खेळला जाईल. असे झाल्यास स्पर्धा 51 ऐवजी 53 दिवस असेल. सध्या यावर चर्चा होत आहे आणि 2 ऑगस्ट रोजी होणार्‍या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अंतिम सामन्यासाठी निश्चित केलेली तारीख 10 नोव्हेंबर, दिवाळी दरम्यान आहे. पूर्वीच्या तारखेवर प्रसारक फारसे खूष नव्हते आणि त्याबद्दल त्यांनी आपला विरोध नोंदवला होता. आयपीएलचे प्रसारक असलेल्या स्टारला दिवाळीचा आठवडा अधिकाधिक वापरायचा आहे. यंदा दिवाळी 14 नोव्हेंबरला आहे, अशा परिस्थितीत अंतिम सामना दिवाळीच्या आठवड्यात खेळला जावा अशी त्याची इच्छा आहे. जर तसे झाले तर रविवारी आयपीएलचा अंतिम सामना न खेळण्याची ही पहिली वेळ असेल.

आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचे सराव शिबिर आयोजित केले जाणार आहे. जे खेळाडू अंतिम सामन्यात खेळणार नाहीत ते खेळाडू या सराव शिबिरामध्ये दाखल होतील. आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू हे कॅम्पमध्ये दाखल होतील आणि एकत्रितरित्या ऑस्ट्रेलियाकडे रवाना होतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

उमर अकमलची बंदी कमी करण्याबद्दल भडकला त्याचाच संघसहकारी, म्हणाला…

आयपीएल जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग, पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने केले कौतुक

आयर्लंड विरुद्ध इंग्लंडचा मोठा विजय, या गोलंदाजाने टाकले तब्बल ३५ डॉट बॉल

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२०: असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म ठरेल त्यांच्या संघासाठी सर्वाधिक फायद्याचा

क्रिकेटच जीव की प्राण: कुटुंबातील सुख-दु:खाच्या क्षणांना बाजूला ठेवत क्रिकेटला प्राधान्य देणारे १० खेळाडू

आपल्या देशासाठी जखम झालेलं स्वत:चं बोट कापायलाही तयार झालेला क्रिकेटर


Previous Post

क्रिकेटच जीव की प्राण: कुटुंबातील सुख-दु:खाच्या क्षणांना बाजूला ठेवत क्रिकेटला प्राधान्य देणारे १० खेळाडू

Next Post

सोशल डिस्टंसिंग पाळत १२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post

सोशल डिस्टंसिंग पाळत १२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Photo Courtesy: Twitter/BCCI & ICC

पाँटिंग आणि धोनी या दोघांत सर्वोत्तम कर्णधार कोण? आफ्रिदीने दिले 'हे' उत्तर

Photo Courtesy: Facebook/IPL

आयपीएल २०२०: 'या' ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.