सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चीनमधील हॅंगझू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आले आहे. या संघातील केवळ राहुल त्रिपाठी वगळता एकही खेळाडू 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नाही. त्यामुळे बीसीसीआय नजीकच्या काळात युवा खेळाडूंना घेऊन नवी संघ बांधणी करण्यासाठी तयार असल्याचे दिसते.
या संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे देऊन बीसीसीआय कर्णधारपदासाठी आणखी एक पर्याय तयार करत असल्याचे दिसते. तसेच आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याचे बक्षीस यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा व प्रभसिमरन यांना मिळाल्याचे दिसत आहे. यासोबतच भारतीय संघासाठी खेळलेले मात्र, सध्या मुख्य संघापासून बाजूला असलेले राहुल त्रिपाठी, शहाबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर व शिवम दुबे यांना भारतीय संघात पुनरागमनाची आणखी एक संधी या स्पर्धेतून मिळू शकते. भविष्यातील मोठा फिरकीपटू म्हणून पाहिला जात असलेला रवी बिश्नोई हा देखील वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर या संघात देखील आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरला. तर वेगवान गोलंदाज आवेश खान व शिवम मावी हे मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघाचा भाग असतील.
भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकानंतर या खेळाडूंमधील बरेचसे चेहरे भारताच्या मुख्य संघात खेळताना दिसू शकतात. त्यामुळे या स्पर्धेसाठी वरिष्ठ खेळाडूंना बाजूला करत भविष्याचा वेध बीसीसीआयने घेतल्याचे दिसते.
एशियन गेम्ससाठी भारतीय संघ-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग.
स्टँडबाय: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन
(BCCi Looking Forward Via Asian Games No Seniors There)
महत्वाच्या बातम्या –
Asian Games 2023 । भारतीय संघाची घोषणा, ‘असे’ आहे हरमनप्रीतच्या नेतृत्वातील स्क्वॉड
भारतीय संघात निवड होताच रिंकूची मोठी प्रतिक्रिया, फक्त एकाच शब्दात झाला व्यक्त