जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या नव्या हंगामासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली असून, विदेशी खेळाडू देखील भारतात पोहोचू लागले आहेत. आयपीएलचा 16 वा हंगाम रंगतदार करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कंबर कसली असून, आयपीएल 2023 मध्ये काही नवीन नियम पाहायला मिळणार आहेत.
आयपीएल 2023 चा पहिला सामना 31 मार्च रोजी खेळला जाईल. तीन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यावेळी भारतातील सर्व शहरांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. त्या दृष्टीने स्पर्धा अधिक रंगतदार बनवण्यासाठी बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल यांनी काही निर्णय घेतल्याचे समजत आहे.
एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार,
आयपीएलचे आयोजक यावेळी स्पर्धेत काही वेगळे नियम लागू करू शकतात. यामध्ये कर्णधारांना नाणेफेकीनंतर आपली प्लेईंग इलेव्हन घोषित करण्याची मुभा दिली जाऊ शकते. अशा प्रकारचा नियम नुकत्याच झालेल्या एसए टी20 लीगमध्ये पाहण्यास आला होता. त्यानंतर यष्टीरक्षक अथवा क्षेत्ररक्षकाने चेंडू टाकण्यापूर्वी फलंदाजाला अडथळा अथवा खेळात व्यत्यय येईल अशी हालचाल केल्यास तो चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. अथवा या चेंडूवर पाच धावांची पेनल्टी देखील दिली जाऊ शकते. तर, निर्धारित वेळेत षटके पूर्ण न करू शकल्यास 30 यार्ड सर्कल बाहेर केवळ चार क्षेत्ररक्षक उभे केले जातील.
आयोजकांनी यापूर्वी इम्पॅक्ट प्लेअर नियम सुरू केला जाणार असल्याचे घोषित केले आहे. यामध्ये कर्णधार नाणेफेकी वेळी बारा खेळाडूंची नावे देऊ शकतो. चालू सामन्यात गरज पडेल तेव्हा त्या बाराव्या खेळाडूला दुसऱ्या खेळाडूच्या जागी बदली करण्यात येईल. हा नियम केवळ भारतीय खेळाडूंसाठी लागू असणार आहे.
(BCCI Looking Major Changes In Rules For IPL 2023 With Impact Player)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठ महिने आधीच कोच द्रविड यांनी उघड केला टीम इंडियाचा ‘वर्ल्डकप प्लॅन’! म्हणाले, “17-18 खेळाडू…”
तब्बल 6 वर्षांनंतर वनडेत स्मिथच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, पंड्याने उचलला सिंहाचा वाटा