आयपीएल 2021 स्पर्धा सुरू होण्यास फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. शुक्रवार (9 एप्रिल ) रोजी संध्याकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने आयपीएल च्या 14 व्या सत्राची सुरुवात होणार आहे. या संदर्भातील सर्व खेळाडूंनी परिपुर्ण तयारीही केलेली आहे.
यादरम्यान, आयपीएल 2021 नंतर जुलैमध्ये होणाऱ्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठे विधान केले आहे. बीसीसीआयने या केलेल्या भाष्याचा थेट परिणाम आयपीएलमध्ये खेळणार्या भारतीय कसोटी संघातील क्रिकेटपटूंवर होणार आहे.
आज (9 एप्रिल)पासून जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडी क्रिकेट स्पर्धा आयपीएल लीगचे विजेतेपद जिंकण्यासाठी आठही संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने दुसर्यांदा या आयपीएल स्पर्धेचे आयोजन केले त्यासंदर्भातील सर्व तयारीही पूर्ण झाली आहे.
टी20 आयपीएल लीगला मर्यादित षटकाच्या स्वरूपातील तज्ज्ञ खेळाडूंची स्पर्धा म्हणून संबोधले जाते. परंतु या लीगच्या प्रत्येक हंगामात अनेक कसोटी संघातील क्रिकेटपटूही खेळताना दिसतात.
कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी 1 ऑगस्ट 2019 रोजी सुरू झालेल्या आयसीसी कसोटी अजिंकपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जून 2021 पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या साउथँम्पटन येथे खेळला जाणार आहे. तत्पुर्वी या अंतिम फेरीसाठी भारतीय संघात जवळपास निवड निश्चित असलेले काही कसोटीपटूंनीही आयपीएल 2021 मध्ये सहभाग घेतला आहे.
त्यामुळे त्यांच्या सरावासाठी बीसीसीआयने म्हटले आहे की “जर कसोटीपटूंना आयपीएल 2021 दरम्यान सराव करण्यासाठी ड्यूक चेंडूची आवश्यकता भासली असेल तर बीसीसीआय त्यांना चेंडूची पूर्तता करणार आहे. कारण आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर काहीच दिवसात लगेच जूनमध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम खेळला जाणार आहे.”
तसेच या अंतिम सामन्यात ड्यूक चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. इंग्लंजमध्ये खेळल्या जाणाऱ्या जवळपास सर्व क्रिकेट सामन्यांमध्ये ड्यूक चेंडूचाच वापर अधिक केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या –
म्हणून कर्णधार रोहित इतरांपेक्षा वेगळा; सूर्यकुमारने सांगितलं हिटमॅनचं ‘टॉप सिक्रेट’
MIvsRCB: देवदत्त पड्डीकलचं स्थान धोक्यात? ‘हे’ दोन शिलेदार आहेत सलामीच्या स्थानाचे प्रबळ दावेदार