---Advertisement---

कोरोनामुळे ‘मेगा लिलाव’ ढकलला जाणार पुढे! बीसीसीआय ऑक्शनची तारिख आणि ठिकाण शकते बदलू

On: गुरूवार, जानेवारी 6, 2022 12:02 AM
ipl-corona
---Advertisement---

भारतात कोरोना व्हायरस (Covid-19)ने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. तिसरी लाट म्हणून याकडे पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटशी संबंधित अनेक कामांना ब्रेक लागला आहे. मंगळवारीच बीसीसीआय (BCCI)ने आपल्या देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफीसह अनेक मोठ्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. आता आयपीएल लिलाव (IPL 2022 Mega Auction) (आयपीएल 2022 मेगा लिलाव) देखील पुढे ढकलण्यात येणार असल्याते समजत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या या मेगा लिलावासाठी बीसीसीआयने बंगळुरू शहर निश्चित केले होते. मात्र या राज्यात कोरोना विषाणूचे नवीन निर्बंध पाहता त्यात बदल होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी देशातील कोरोना विषाणूची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर बीसीसीआयने 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये मेगा लिलावाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. स्पोर्ट्स वेबसाइट इनसाइड स्पोर्ट्सनुसार, परंतु आता कोरोनामुळले बीसीसीआयने ‘प्लॅन बी’वर तयारी सुरू केली आहे. कर्नाटक सरकारने अद्याप कोरोनाबाबत कोणतीही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी न केल्याने ते सध्या प्रतीक्षा करत आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितले की, “काही गोष्टी आमच्या हातात नाहीत आणि आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. जर आम्हाला निर्बंधांची कल्पना असेल तर आमच्यासाठी इतर गोष्टी बुक करणे आणि व्यवस्था करणे समस्या नाही. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि राज्य संघटनांच्या संपर्कात आहोत. आम्हाला स्थळ बदलण्याची आवश्यकता असल्यास, आम्हाला ते अल्पावधीत बदलावे लागेल.”

बीसीसीआयने या वर्षापासून जगातील या सर्वात मोठ्या टी20 क्रिकेट लीगमध्ये दोन नवीन संघ जोडले आहेत. आता या मोसमापासून या लीगमध्ये 8 ऐवजी 10 संघ सहभागी होतील. लिलावाच्या आधारे बोर्डाने या लीगमध्ये लखनौ आणि अहमदाबादचे नवीन संघ आधीच जोडले आहेत. ड्राफ्टमधून निवडलेल्या तीन खेळाडूंची घोषणा करण्यासाठी दोन्ही संघांकडे ख्रिसमसपर्यंत वेळ आहे. सीव्हीसीचा होकार मिळणे बाकी असल्याने बीसीसीआय त्याला अतिरिक्त वेळ देऊ शकते.

यापूर्वी असे वृत्त होते की, यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसआय) हा लिलाव यूएईमध्ये आयोजित करू शकते, परंतु बोर्डाची सध्या अशी कोणतीही योजना नाही. कोविड-19 मुळे जगभरात पुन्हा एकदा नवीन निर्बंध लागू होत आहेत. अशा परिस्थितीत हा लिलाव देशातच व्हावा, अशी मंडळाची इच्छा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘क्रिकेटच्या देवाने स्वतः माझ्याबद्दल ट्विट केले हे माझे भाग्य’, खुद्द सचिनने कौतुक केल्याने भारावला शार्दुल

सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह की विराटचा कव्हर ड्राईव्ह? विस्फोटक कांगारू फलंदाजाने सांगितले त्याचे आवडते शॉट

अति शहानपणा नडला! ‘तोंड बंद ठेव’, म्हणत द. आफ्रिकी गोलंदाजाला भिडला अन् असा तोंडघशी पडला

हेही पाहा-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---