ऑस्ट्रेलियाचा (australia cricket team) दिग्गज फलंदाज मार्नस लाबुशेन (marnus labuschagne) याने त्याचे काही आवडते शॉट सांगितले आहेत. यावेळी त्याने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (sachin tendulkar) स्ट्रेट ड्राइव आणि विराट कोहलीच्या (virat kohli) कव्हर ड्राइवचा उल्लेख केला. तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगच्या (Ricky pointing) पुल शॉटचा देखील उल्लेख केला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलताना मार्नस लाबुशेनने त्याचे आवडते शॉट निवडले. यावेळी तो म्हणाला, “उजव्या हाताच्या फलंदाजांमध्ये मी सचिन तेंडुलकरच्या स्ट्रेट ड्राइवपासून सुरुवात करू इच्छितो. तो एक असा शॉट होता, जो पाहून खूप चांगले वाटायचे. या शॉटमध्ये सचिन तेंडुलकरचा पूर्ण क्लास असायचा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मी रिकी पॉंटिंगच्या ट्रेडमार्क पुल शॉटला ठेवेल. त्यांचा हा शॉट प्रत्येकाच्या आवडीचा होता.”
भारतीय कर्णधार विराट कोहलीचे देखील केले कौतुक
भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या कव्हर ड्राइवसाठी प्रसिद्ध आहे. लाबुशेनने पुढे बोलताना विराट कोहलीच्या कव्हर ड्राइवला देखील त्याच्या आवडीच्या शॉटमध्ये निवडले. त्याव्यतिरिक्त केविन पीटरसनच्या आक्रमक फलंदाजीचा, स्टीव स्मिथची धावा करण्याची चिकाटी आणि जॅक कॅलिसच्या टेंपरामेंटचा देखील पुढे लाबुशेनने उल्लेख केला.
तो पुढे बोलताना म्हणाला की, “मला विराट कोहलीचा कव्हर ड्राइव खूप आवडतो. ज्याप्रकारे तो हा शॉट खेळतो, त्यावरून समजते की, तो उर्जेसह खेळत आहे. त्यानंतर केविन पीटरसनचा लेग साइडचा शॉटदेखील खूप आवडायचा आणि ज्याप्रकारे आक्रमकतेसह तो खेळायचा ती अप्रतिम होती. विराट कोहलीप्रमाणेच ते देखील खेळपट्टीवर खूप आक्रमक असायचे. त्यानंतर स्टीव स्मिथमध्ये जी धावा करण्याची भूक आहे, मी त्याचीही निवड करेल. त्यामध्ये तो दृढ संकल्प आहे. तसेच जॅक कॅलिस ज्याप्रकारे खेळपट्टीवर टिकून राहयचा, ती टेंपरामेंटदेखील मला खूप आवडायची.”
महत्वाच्या बातम्या –
व्हिडिओ पाहा –