---Advertisement---

कसोटी विशेषज्ञ मार्नस लॅब्यूशेनची टी२० स्पर्धेत कमाल; मिळू शकते आयपीएल अन् विश्वचषकात संधी

On: गुरूवार, जून 17, 2021 5:10 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघातील कसोटी विशेषज्ञ म्हणून मार्नस लॅब्यूशेन ओळखला जातो. आजपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाचा भाग होता आले नाही. पंरतु इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी20 ब्लास्टमध्ये त्याने शानदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या प्रदर्शनाने तो विरुद्ध संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत आहे. अशामध्ये जर तो आयपीएल खेळताना दिसला, तर आश्चर्य वाटायला नको. याव्यतिरिक्त यावर्षी होण्याऱ्या टी20 विश्वचषकात देखील ऑस्ट्रेलिया संघाचा तो भाग होऊ शकतो. (Australian Cricketer Marnus Labuschagne On Form In The T20 Blast )

लॅब्यूशेन आतापर्यंत या टी20 ब्लास्ट स्पर्धेच्या या हंगामात 4 सामने खेळला असून तो ग्लेमॉर्गन संघाचं प्रतिनिधित्व करतो. आतापर्यंतच्या 4 सामन्यांत त्याने 82.66 च्या सरासरीने तब्बल 248 धावा केल्या आहेत. चार सामन्यात त्याने तीन वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 143.35 इतका राहिला आहे.

त्याने ग्लोस्टरशायर संघाविरुद्ध 56 चेंडूत नाबाद 93 धावा, एसेक्स विरुद्ध 47 चेंडूत 59 धावा, सरेविरुध्द खेळताना 51 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी केली. याव्यतिरिक्त चौथ्या सामन्यात त्याने २२ धावा ठोकल्या. या ४ सामन्यात त्याने 26 चौकार आणि 4 षटकारांची आतिषबाजी केली आहे.

9 षटकात टिपले 4 बळी-
मार्नस लॅब्यूशेनने फक्त फलंदाजीत कमाल केली नसून गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांत 6 बळी घेतले आहेत. त्याला 13 षटक गोलंदाजी करायला मिळाली. त्यात त्याने 6.76 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली. ग्लोस्टरशायर आणि एसेक्स विरुद्ध त्याने प्रत्येकी 1 बळी घेतला, तर सरे आणि केंटविरुद्ध गोलंदाजी करतांना 2 बळी टिपले.

आतापर्यंत खेळलेत 20 टी20 सामने
मार्नस लॅब्यूशेनने टी20 कारकिर्दीत आतापर्यंत 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 19 डावात 30.64 च्या सरासरीने 521 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 अर्धशतक ठोकले आहेत. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना त्याने 16 डावात 18.52 च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या आहेत.

दिसू शकतो आयपीएलमध्ये
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचे आयोजन होणार असून, अनेक विदेशी खेळाडूंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह आहेत. अशामध्ये मार्नस लॅब्यूशेन आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला आयपीएल दरम्यानच दिली आहे ‘ही’ चेतावणी, आता राहावे लागणार सावध

रोहित शर्माला WTC फायनलपूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणचा ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ सल्ला

WTC फायनलसाठी कशी असायला हवी भारताची फलंदाजी क्रमवारी? व्हीव्हीएस लक्ष्मणने दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---