---Advertisement---

अखेर चार वर्षांनंतर विराटच्या ‘त्या’ प्लॅननुसार चालणार टीम इंडिया; आधी दिलेला नकार

On: सोमवार, जानेवारी 2, 2023 3:28 PM
Virat-Kohli
---Advertisement---

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाची (बीसीसीआय) एक बैठक पार पडली. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख लक्ष्मण यांनी हजेरी लावली. या बैठकीत काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. आगामी वनडे विश्वचषक लक्षात घेता वनडे संघाबाबत मोठे निर्णय घेतले गेले. भारतीय संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने चार वर्षांपूर्वी सुचवलेला पर्याय आजमावण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

भारतात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या विश्वचषकाआधी भारतीय संघाला जवळपास 25 सामने खेळायचे आहेत. या 25 सामन्यांमध्ये भारतीय संघ एका खास रणनितीने खेळताना दिसेल. केवळ 20 खेळाडूंनाच अदलीबदली करून या विश्वचषकाआधी संधी दिली जाईल. या 20 खेळाडूंमधूनच अंतिम 15 जणांचा संघ निवडला जाईल. बीसीसीआयने अधिकृतपणे ही घोषणा केली आहे.

अशाच प्रकारचा पर्याय विराट कोहली याने ‌‌‌2019 च्या सुरुवातीला सुचवलेला होता. विराटच्या म्हणण्यानुसार, विश्वचषकात चार वर्षांनी येत असतो. तर, आपण आयपीएल दरवर्षी खेळतो. त्यासाठी खेळाडूंवर देखरेख ठेवणे आणि त्यांचे वर्कलोड मॅनेजमेंट करणे गरजेचे आहे. एखादा खेळाडू दुखापतीकडे चालला असला तर, त्याला आयपीएल आणि थोड्या कमी महत्त्वाच्या मालिका खेळण्यापासून रोखले जाऊ शकते.

मात्र, विराटच्या या कल्पनेला त्यावेळी केराची टोपली दाखवली गेलेली. मात्र, आता पुढील दीड वर्षात होऊ घातलेल्या दोन विश्वचषकांमुळे बीसीसीआय याच रणनीतीने पुढे जाताना दिसेल. कोणता खेळाडू किती आयपीएल सामने खेळणार याबाबत देखील बीसीसीआय निर्णय घेऊ शकते. नव्या निर्णयानुसार केवळ आयपीएलमधील प्रदर्शनाच नव्हेतर, देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात जागा दिली जाईल. तसेच बीसीसीआय, आयपीएल संघ व एनसीए यांच्या ताळमेळातून खेळाडूवर देखरेख ठेवण्यात येईल.

(BCCI New Plan For ICC ODI World Cup That Virat Kohli Proposed 4 Years Back)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकीचा वर्ल्डकप येतोय! जाणून घ्या भारताचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
बीसीसीआयच्या निर्णयावर आयपीएल फ्रॅंचायजींचे प्रत्युत्तर! म्हणाले, ‘ते असे नाही म्हणू…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---