भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या भीतीने भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शार्दुलला भारत अ संघाचा भाग होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जावे लागणार होते. मात्र, त्याचे रवाना होते तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. आता तो भारताच्या वरिष्ठ संघाच्या शिबिराचा भाग असेल. ओमिक्रॉनच्या धोक्यात भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिका अ संघासोबत मालिका खेळत आहे. शार्दुलही या मालिकेचा एक भाग असणार होता.
तिसऱ्या सामन्यात होणार होता सहभागी
शार्दुल येत्या काही दिवसांत दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. ओमिक्रॉनच्या सावटाखाली बीसीसीआय कोणताही धोका घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे वृत्त येत आहे. शार्दुल ६ डिसेंबरपासून होणाऱ्या शेवटच्या चार दिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध खेळणार होता. दक्षिण आफ्रिकेतील भारत अ संघात सामील होण्यापूर्वी शार्दुलला नियमानुसार ३ दिवस क्वारंटाइन जावे लागणार होते.
भारत अ संघाचा दौरा सुरूच
कोरोनाच्या नवीन प्रकाराचा धोका असतानाही क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने भारत अ सोबतची मालिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लोमफॉन्टेनमध्ये कोरोनाचे एकही प्रकरण समोर न आल्यामुळे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने हे पाऊल उचलले. याशिवाय, संघ देखील बायो बबलमध्येच आहेत. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितले की, “भारत अ संघ त्यांच्या वेळापत्रकानुसार खेळत राहील. सर्व खेळाडू बायोबबलमध्ये आहेत. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि याबाबत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या संपर्कात आहोत. रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवले जातायेत. आम्हाला भारत सरकारकडून कोणतीही सूचना मिळालेली नाही. त्यामुळे सध्या भारत अ संघाचा दौरा सुरू राहिल.”
बीसीसीआयने शार्दुलला दक्षिण आफ्रिकेला न पाठवण्याचा निर्णय घेतला असला तरी, ईशान किशन आणि दीपक चहर हे दोन खेळाडू तीन दिवसांच्या क्वारंटाईननंतर भारत अ संघाचा भाग बनले आहेत. न्यूझीलंडविरूद्ध टी२० मालिका संपताच हे दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या विश्वविजयानंतर जल्लोष करणारी ‘ही’ व्यक्ती ओळखली का? नाव आहे चर्चेत
आयपीएल संघांनी रिटेन केलेले ‘भारताचे भविष्य’; घ्या जाणून ‘त्या’ चौकडीविषयी
किंमत घटली! रोहित आणि पंतसह ‘या’ पाच खेळाडूंना मिळालीय धोनीपेक्षा जास्त रक्कम